जिओने मोबाईल वेब ब्राउझर Jio Pages केलं लाँच; जाणून घ्या...

By ravalnath.patil | Published: October 21, 2020 08:50 PM2020-10-21T20:50:47+5:302020-10-21T20:51:18+5:30

Jio launches made in India Jio Pages browser : हे वेब ब्राउझर फक्त Android साठी उपलब्ध आहे आणि Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते.

jio launches jio pages mobile web browser | जिओने मोबाईल वेब ब्राउझर Jio Pages केलं लाँच; जाणून घ्या...

जिओने मोबाईल वेब ब्राउझर Jio Pages केलं लाँच; जाणून घ्या...

Next
ठळक मुद्देस्टँडर्ड मोबाईल वेब ब्राउझरप्रमाणे यामध्ये तुम्ही कोणत्याही सर्च इंजिनला डीफॉल्ट बनवू शकता. तसेच, यामध्ये डार्क थीम सुद्धा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : Reliance Jio ने आता Jio Pages नवीन वेब ब्राउझर लाँच केले आहे. दरम्यान, याआधी Jio Browser होते, पण त्याला खास ट्रक्शन मिळाले नाही. आता कंपनीने Jio Browser च्या जागी Jio Pages आणले आहेत. Jio Browser च्या तुलनेत यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.

चीनी लोकप्रिय वेब ब्राउझर यूसीवर बंदी घालण्यात आली असल्यामुळे वेब ब्राउझरवर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची इच्छा आहे, जेणेकरून युजर्संना आपल्याकडे आकर्षित करता येईल. Jio Pages मध्ये 8 भारतीय भाषांचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, या ब्राउझरवर डेटा प्रायव्हसीवर सुद्धा फोकस करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

दरम्यान,  Jio Pages ला क्रोमियम ब्लिंग इंजिनवर डेव्हलप करण्यात आले आहेत. कंपनीने म्हटले आहे की, हे स्पीडने पेज लोड करते. मीडिया स्ट्रीमिंग इफिशिएंट आहे आणि युजर्संना एनक्रिप्टेड कनेक्शन मिळते. स्टँडर्ड मोबाईल वेब ब्राउझरप्रमाणे यामध्ये तुम्ही कोणत्याही सर्च इंजिनला डीफॉल्ट बनवू शकता. तसेच, यामध्ये डार्क थीम सुद्धा देण्यात आली आहे.

Jio Pages मध्ये वैयक्तिकृत कंटेंट मिळेल. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार विषय निवडू शकता. तसेच, फीडमध्ये अशाच प्रकारे बातम्या सुद्धा दिसतील. गोपनीयता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने यामध्ये एण्ड ब्लॉकर इनकॉग्निटो मोड सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात हिंदी, मराठी, तामिळ, गुजराती, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांचा सपोर्ट आहे. दरम्यान, हे वेब ब्राउझर फक्त Android साठी उपलब्ध आहे आणि Google Play Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते.
 

Web Title: jio launches jio pages mobile web browser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.