JioHotstar सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतंय फ्री, सर्व क्रिकेट सामन्यांचे Free Live Streaming
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:04 IST2025-02-25T17:03:44+5:302025-02-25T17:04:42+5:30
नवीन जिओ रिचार्ज हा एक अॅड-ऑन प्लॅन आहे, जो रेग्युलर प्लॅनसोबत रिचार्ज करावा लागेल. जिओने याला 'Cricket Data Pack' असे नाव दिले आहे.

JioHotstar सबस्क्रिप्शन ३ महिन्यांसाठी मिळतंय फ्री, सर्व क्रिकेट सामन्यांचे Free Live Streaming
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. खास गोष्ट म्हणजे जिओच्या १९५ रुपयांच्या नवीन डेटा प्लॅनमध्ये जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन तीन महिन्यांसाठी फ्री मिळत आहे. लेटेस्ट डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅनसह ग्राहकांना जिओ हॉटस्टारवर असलेल्या संपूर्ण लायब्ररीचा अॅक्सेस मिळतो.
ग्राहक जिओ हॉटस्टारवर WPL 2025 आणि ICC Champions Trophy 2025 तसेच आगामी IPL 2025 सारख्या क्रिकेट सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग करू शकतील. नवीन जिओ रिचार्ज हा एक अॅड-ऑन प्लॅन आहे, जो रेग्युलर प्लॅनसोबत रिचार्ज करावा लागेल. जिओने याला 'Cricket Data Pack' असे नाव दिले आहे. २०० रुपयांपेक्षा कमी किमतीतच्या या प्लॅनमध्ये ९० दिवसांसाठी १५ जीबी डेटा मिळतो.
याशिवाय, अॅड-सपोर्टेड जिओ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देखील तीन महिन्यांसाठी मिळते. याचा अर्थ, तुम्हाला कंटेंट पाहताना जाहिराती पाहाव्या लागतील. तसेच, या सबस्क्रिप्शनसह ग्राहक आपल्या स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर ७२० पिक्सेल रिझोल्यूशनवर कंटेंट स्ट्रीम करू शकतात. परंतु ग्राहक एका वेळी फक्त एकाच डिव्हाइसवर कंटेंट पाहू शकतील.
जर तुम्ही जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन प्लॅन वेगळा घेतला तर तुम्हाला तीन महिन्यांसाठी १४९ रुपये द्यावे लागतील. पण, आता तुम्ही ४६ रुपये अतिरिक्त देऊन १५ जीबी अतिरिक्त डेटा मिळवू शकता. हे रिचार्ज विशेषतः सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान खूप उपयोगात येईल. जर तुम्ही ४ जी स्मार्टफोन वापरत असाल आणि अनलिमिटेड ५ जी डेटा असलेला प्लॅन हवा असेल तर हा रिचार्ज प्लॅन एक चांगला ऑप्शन आहे.
जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन फ्री ऑफर करणारा हा जिओचा दुसरा रिचार्ज प्लॅन आहे. यापूर्वी, हे सबस्क्रिप्शन जिओच्या ९४९ रुपयांच्या नियमित रिचार्ज प्लॅनमध्ये देखील फ्री मिळत होते. या प्लॅनची व्हॅलिडिटी ८४ दिवसांची आहे. या रिचार्जमध्ये दररोज २ जीबी ४जी डेटा मिळतो. याशिवाय, ९० दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल, ५जी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि जिओहॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
जर तुमच्या मोबाईलवर सध्या कोणताही बेस प्लॅन नसेल, तर तुम्ही जिओचा ९४९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन घेऊ शकता. तसेच, जर तुमच्याकडे आधीच रिचार्ज प्लॅन असेल, तर तुम्ही नवीन १९५ रुपयांचा प्लॅन रिचार्ज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला १५ जीबी अतिरिक्त डेटासह जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मिळेल.