जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:33 PM2024-09-17T12:33:04+5:302024-09-17T12:33:16+5:30

जिओचे युजर्स बहुसंख्य आहेत. जिओच्या नेटवर्कचे आऊटेज होताच अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत तक्रारी केल्या आहेत.

Jio outage News: Reliance Jio Mobile Services down in Mumbai, Pune network outage from morning | जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

आज सकाळपासून मुंबई पुणे शहरांमध्ये जिओचे नेटवर्क गायब झालेले आहे. पुण्यात सकाळी तर मुंबईत गेल्या तासाभरापासून जिओचे नेटवर्क गायब झाल्याच्या तक्रारी युजर्स करत आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आदी भागात जिओची रेंज लपंडाव खेळत आहे. 

जिओचे युजर्स बहुसंख्य आहेत. जिओच्या नेटवर्कचे आऊटेज होताच अनेकांनी सोशल मीडियाचा आधार घेत तक्रारी केल्या आहेत. अनेकांनी सेकंडरी सिम, व्हॉ़ट्सअप कॉलचा आधार घेतला आहे. मुंबईतील काही भागातील सेवा गेल्या तासाभरापासून बंद आहे. एकाच कंपनीवर अवलंबून असलेल्यांची चांगलीय पंचाईत झाली आहे. 

डाऊन डिटेक्टरनुसार Jio च्या सेवांमध्ये आज सकाळपासूनच समस्या येत आहे. रिलायन्स जिओकडून अद्याप या समस्येबद्दल काही माहिती आलेली नाही. काही भागात नेटवर्क आहे, तर काही भागातील नेटवर्क गायब झालेले आहे. 


 

Web Title: Jio outage News: Reliance Jio Mobile Services down in Mumbai, Pune network outage from morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.