फुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 12:11 PM2018-02-02T12:11:55+5:302018-02-02T12:13:30+5:30
जिओच्या 4 जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरू केली आहे.
मुंबई- जिओच्या 4 जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरू केली आहे. जिओच्या या फुकटात मिळणाऱ्या फोनही कुणीही खरेदी करू शकतं. www,jio.com या जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहकांना मोबाइल विकत घेता येईल. जिओचा 4जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना 1500 रूपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावे लागणार आहेत. 1500 रूपयांचं डिपॉझिट तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. एकंदरीत जिओचा हा 4जी फोन ग्राहकांना फुकटात मिळणार आहे. जिओचा फोन विकत घेण्यासाठी आधी बुकिंग करावं लागणार आहे.
असा विकत घ्या जिओचा 4जी फीचर फोन-
- जिओची www.jio.com ही वेबासाईट सुरू करा. वेबसाईट सुरू केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला साईटवर जिओचा 4जी फीचर फोन दिसेल.
- त्यानंतर नाऊ ऑर्डर या समोर आलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्याकडे तुमचा मोबाइल नंबर मागितला जाईल. मोबाइल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.
- मोबाइल नंबर सबमिट केल्यानंतर तुमच्याकडून डिटेल्स मागितल्या जातील. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला पोस्टल कोड टाकायचा आहे. एकपेक्षा जास्त फोन हवे असतील तर तसे आकडे तिथे टाका.
- जर दुसऱ्या नावांनी मोबाइल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करून दुसरा मोबाइलनंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. व त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.
- प्रोसीड केल्यानंतर मोबाइलसाठी द्यावी लागणारे 1500 रूपये भरण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल. पे या ऑप्शनवर क्लिक करा.
- त्यामध्ये UPI, JIO Money, Paytm, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पैसे भरू शकता.
- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाइलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा 4जी फीचर फोनची डिलिव्हरी मिळेल.