Reliance Jio : जिओ फोन-2 चा फ्लॅश सेल उद्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 03:29 PM2018-08-15T15:29:42+5:302018-08-15T15:40:47+5:30
व्हाट्सअॅपबाबत संभ्रम
मुंबई : जिओने 4जी इंटरनेट सेवेमध्ये अग्रस्थान पटकावले असताना केवळ 1500 रुपयांत जिओ फोन 1 लाँच करून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले होते. आता जिओचा फोन- 2 लाँच झाला असून त्याचा उद्या फ्लॅश सेल जाहीर करण्यात आला आहे.
जिओ फोन- 2 हे फोन 1 चे अपडेटेड व्हर्जन आहे. यापुर्वी झालेल्या रिलायन्स समुहाच्या बैठकीमध्ये मुकेश अंबानी यांनी जिओ फोन- 2 ची विक्री 15 ऑगस्टपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू, या फोनची विक्री एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. आता या फोन 2 ची विक्री Jio.com वर फ्लॅश सेलद्वारे दुपारी 12 वाजता होणार आहे.
अंबानी यांनी या नव्या फोनमध्ये व्हॉट्स अॅपची सुविधा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, सध्यातरी या फोनमध्ये व्हॉट्स अॅप मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे.
काय आहे जिओ फोन - 2 ची किंमत
जिओ फोन - 2 किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. बुकिंग करताना पूर्ण रक्कम द्यावी लागणार आहे. फ्लॅश सेल उद्यापासून सुरु होत असला तरीही त्याची डिलीव्हरी कधी होणार याबाबत कंपनीने काहीही सांगितलेले नाही. मागणी जादा असल्याने थोडा विलंब होऊ शकतो. या फोनमध्ये क्वार्टी किपॅड, गुगल असिस्टंट इंटीग्रेशन आणि कदाचित व्हाट्सअॅपचा सपोर्ट मिळणार आहे.