Jio Phone Next Sale: रजिस्ट्रेशन आणि EMI Plan विना विकत घेता येणार जियोचा 4G Smartphone; इथून घ्या विकत  

By सिद्धेश जाधव | Published: November 26, 2021 07:50 PM2021-11-26T19:50:19+5:302021-11-26T19:51:49+5:30

Jio Phone Next: Jio Phone Next आता ओपन सेल अंतर्गत Reliance Digital Store वरून विकत घेता येईल. इथे बँक ऑफर्स आणि डिस्काउंट देखील दिला जात आहे.

Jio phone next available for purchase on reliance digital without any registration  | Jio Phone Next Sale: रजिस्ट्रेशन आणि EMI Plan विना विकत घेता येणार जियोचा 4G Smartphone; इथून घ्या विकत  

Jio Phone Next Sale: रजिस्ट्रेशन आणि EMI Plan विना विकत घेता येणार जियोचा 4G Smartphone; इथून घ्या विकत  

googlenewsNext

Jio Phone Next आता ओपन सेलसाठी उपलब्ध झाला आहे. आतापर्यंत या मोबाईल विकत घेण्यासाठी रजिस्ट्रेशनची मोठी प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. परंतु आता हा स्मार्टफोन थेट ऑनलाइन शॉपिंग साईट Reliance Digital Store वरून विकत घेता येईल. तसेच या शॉपिंग साईटवर वेगवेगळ्या बँक ऑफर तसेच डिस्काउंट देखील दिला जात आहे.  

विशेष म्हणजे या वेबसाईटवरून हा फोन खरेदीसाठी करण्यासाठी कोणताही EMI Plan घेण्याची आवश्यकता नाही. थेट 6,499 रुपये देऊन जियोफोन नेक्स्ट खरी आणता येईल आणि वापरता येईल जर तुम्ही हा फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे कारण ईएमआय प्लॅनमध्ये हा फोन विकत घेणे महाग पडू शकते.  

Jio Phone Next Specification    

या फोनमध्ये 5.45-इंचाचा (720 X 1440 पिक्सल) एचडी डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले कोर्निंग गोरिल्ला ग्लास-3 सह सादर केला जाईल. फोनयामध्ये 2जीबी रॅम आणि 32जीबी इंटरनल मेमरी मिळेल. ही मेमरी 512जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डनेवाढवता येईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट मिळेल.    

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रियर आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. Jio Phone Next मध्ये 3500एमएएचची बॅटरी देण्यात येईल. जियोफोन नेक्स्ट गुगल अँड्रॉइडने बनवलेल्या प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. तसेच यात अनेक जियो आणि गुगल अ‍ॅप्स प्रीलोडेड मिळतील.     

Web Title: Jio phone next available for purchase on reliance digital without any registration 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.