वाईट बातमी! किफायतशीर किंमतीत येणार नाही JioPhone Next 4G; जाणून घ्या कारण
By सिद्धेश जाधव | Published: September 14, 2021 03:28 PM2021-09-14T15:28:06+5:302021-09-14T15:28:30+5:30
JioPhone Next Price In India: रिपोर्टनुसार रिलायन्स JioPhone Next ची किंमत बदलू शकते. जगात चिप्सचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्मार्टफोन्सचे कंपोनंट 20 टक्क्यांनी महागले आहेत.
Reliance ने यावर्षी जूनमध्ये झालेल्या आपल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत नव्या स्मार्टफोनची घोषणा केली होती. यावेळी सांगण्यात आले होते कि JioPhone Next जगातील सर्वात स्वस्त 4G फोन असेल. जूनमध्ये कंपनीने 10 सप्टेंबर ही तारीख फोनच्या विक्रीची तारीख असेल असे सांगितले होते. परंतु कंपोनंट्सच्या तुटवड्यामुळे हा सेल पुढे ढकलण्यात आला आहे. JioPhone Next दिवाळीत विक्रीसाठी येईल असे कंपनीने सांगितले आहे. आता इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार रिलायन्स JioPhone Next ची किंमत बदलू शकते.
आतापर्यंत कंपनीने JioPhone Next ची अधिकृत किंमत सांगितलेली नाही. काही रिपोर्ट्सनुसार हा फोन 3,499 रुपयांमध्ये सादर होणार होता. परंतु आता इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, JioPhone Next ची किंमत अफवा यापेक्षा अधिक असेल. जगात चिप्सचा पुरवठा कमी झाल्यामुळे स्मार्टफोन्सचे कंपोनंट 20 टक्क्यांनी महागले आहेत. यामुळे अनेक स्मार्टफोन निर्माता कंपन्या आपल्या स्मार्टफोन्सच्या किंमती वाढवत आहेत. तसाच परिणाम JioPhone Next च्या किंमतीवर देखील दिसून येईल.
JioPhone Next स्पेसिफिकेशन्स
लीक रिपोर्टनुसार, जियोफोन नेक्स्टमध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले दिली जाईल. हा ड्युअल सिम फोन 4G VoLTE सपोर्ट आणि अँड्रॉइड 11 ‘गो’ एडिशनसह सादर केला जाईल. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 215 चिपसेट मिळू शकतो. जियोफोन नेक्स्टमध्ये 3 जीबी पर्यंत रॅम आणि 32जीबी पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनल एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर मिळेल. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. जियोफोन नेक्स्टमध्ये 2,500एमएएच बॅटरी मिळू शकते.