Jio ला टक्कर देणार Realme; Dizo Star 500 आणि Star 300 फीचर फोन करणार भारतात लाँच  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:33 PM2021-06-03T18:33:31+5:302021-06-03T18:34:17+5:30

Realme Dizo Feature phones: TWS ईयरबड्स आणि स्मार्टवॉचची माहिती आल्यानंतर आता Realme Dizo अंतगर्त दोन फीचर फोन लाँच करणार आहे अशी माहिती समोर येत आहे. 

Jio phone like Realme dizo star 500 300 feature phone wil launch soon   | Jio ला टक्कर देणार Realme; Dizo Star 500 आणि Star 300 फीचर फोन करणार भारतात लाँच  

सौजन्य: गिजमोचायना

Next

सध्या भारतात सर्वात असलेले सर्वात स्वस्त 4G फोन म्हणजे रिलायंस जियोचे JioPhone आणि JioPhone 2. या दोन्ही फोन्सना आव्हान देण्यासाठी Realme आपले नवीन आणि पहिले फीचर फोन लाँच करण्याची योजना बनवत आहे. तुम्हाला माहित असेल कि, गेल्या आठवड्यात रियलमीने आपल्या नवीन टेक लाइफ ब्रँड Dizo ची घोषणा केली होती. Dizo अंतर्गत कोणताही फोन लाँच केला जाणार नाही असे सांगण्यात आले होते. परंतु, Dizo अंतर्गत फोन फिचर फोन लाँच केले जातील, अशी चर्चा आहे. (Realme may launch feature phon under dizo brandig)  

Gizmochina च्या अहवालानुसार, Realme च्या सब-ब्रँड कंपनी DIZO चे दोन फीचर फोन FCC सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले आहेत. या फोनची नावं Dizo Star 500 आणि Dizo Star 300 असतील. इतकेच नव्हे तर या फीचर फोन्सचे फोटोज देखील समोर आले आहेत. यातील एका फोनचा डिस्प्ले कीपॅडसह थोडा छोटा दिसत आहे, तर दुसऱ्या फोनमध्ये कीपॅडसह डिस्प्ले तुलनेने थोडा मोठा आहे. स्टार 500 फीचर फोनमध्ये स्टार 300 फोनपेक्षा मोठा डिस्प्ले मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, दोन्ही फोन्सच्या डिस्प्लेच्या खाली ‘DIZO' ची ब्रँडिंग देण्यात आली आहे. त्याचबरोबर, फोनमध्ये डुअल-सिम आणि एक माइक्रो एसडी कार्ड स्लॉट पण देण्यात येईल. 

या दोन्ही फोन्समध्ये 2G कनेक्टिविटी मिळेल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, या फोन्समध्ये सिंगल कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश मिळेल. स्टार 500 फीचर फोनची बॅटरी 1,830एमएएचची असू शकते, तर स्टार 300 फीचर फोनमध्ये 2,500 एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. 

Web Title: Jio phone like Realme dizo star 500 300 feature phone wil launch soon  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.