Jio: जियो करणार डबल धमाका! परवडणाऱ्या किंमतीत Jio Smart TV आणि Jio Tablet येणार बाजारात
By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 07:49 PM2021-11-29T19:49:28+5:302021-11-29T19:49:47+5:30
Jio Smart TV आणि Jio Tablet पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात. स्मार्टफोन्सनंतर आता कंपनी अजून हार्डवेअर लाँच करण्याची तयारी करत आहे.
रिलायन्स जियो हार्डवेयर सेगमेंटमध्ये लवकरच जास्त सक्रिय होऊ शकते. कंपनीनं काही दिवसांपूर्वी JioPhone Next भारतात सादर केला होता. तसेच अलीकडंच Jio Book या लॅपटॉपची देखील बातमी आली होती. हा लॅपटॉप अनेक लिस्टिंग्समधून समोर आला होता. तर आता 91मोबाईल्सनं Jio Smart TV आणि Jio Tablet देखील बाजारात येणार असल्याची माहिती दिली आहे. हे दोन्ही डिवाइस पुढील वर्षी भारतीयांच्या भेटीला येऊ शकतात.
Jio Smart TV
91मोबाईल्सनं रिलायन्स जियो एका Smart TV काम करत असल्याची माहिती दिली आहे. हा स्मार्ट टीव्ही Jio Fiber सोबत बंडल ऑफर अंतर्गत दिला जाऊ शकतो. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि अॅमेझॉन असे ओटीटी अॅप्स प्री-लोडेड मिळतील. इतर स्मार्ट टीव्ही निर्मात्यांना टक्कर देण्यासाठी कंपनी या जियो स्मार्ट टीव्हीची किंमत खूप कमी ठेऊ शकते.
Jio Tablet
गेल्या दोन वर्षात टॅबलेट सारख्या डिवाइसची गरज खूप वाढली आहे, हे कंपनीनं हेरलेलं दिसतंय. म्हणूनच कंपनी परवडणाऱ्या किंमतीत Jio Tablet सादर करू शकते. रिपोर्टनुसार यात जियोफोन नेक्स्ट प्रमाणे PragatiOS मिळेल. ही एक हलकी ऑपरेटिंग सिस्टम आहे, त्यामुळे कमी रॅम आणि इतर स्पेक्स लागतील. या डिवायसमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. त्याला मोठ्या डिस्प्लेची जोड मिळेल. Reliance Jio ने या दोन्ही डिवाइसची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.