Jio युजर्सना पुन्हा झटका, आता 'या' रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत ३०० रुपयांची वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 02:49 PM2024-08-30T14:49:00+5:302024-08-30T14:49:34+5:30
Jio Recharge Plan Price : जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा बदल त्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन मोफत दिले जात होते.
Jio Recharge Plan Price : नवी दिल्ली : अलीकडेच जिओनं (Jio) आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली होती. यामुळे युजर्सना बेनिफिट्स मिळवण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. दरम्यान, जिओ वेळोवेळी रिचार्ज प्लॅनच्या किंमती बदलत असते. हे प्लॅन यूजर्सना लक्षात घेऊन बदलले जातात. आता पुन्हा एकदा त्यात बदल करण्यात आले आहेत. जिओने प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा बदल त्या रिचार्ज प्लॅनमध्ये करण्यात आला आहे, ज्यामध्ये नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन मोफत दिले जात होते.
रिचार्ज प्लॅनच्या नवीन किमती लाईव्ह झाल्या आहेत आणि त्या जिओ वेबसाइट आणि माय जिओ ॲपवर पाहता येतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स जिओच्या नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत २०० ते ३०० रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शनसोबत येणाऱ्या रिलायन्स जिओच्या प्रीपेड प्लॅनची किंमत आधी १०९९ रुपये आणि १४९९ रुपये होती. आता जिओ प्रीपेड नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत १२९९ रुपये आणि १७९९ रुपये झाली आहे.
अलीकडेच, जिओने टॅरिफ प्लॅनची किंमत वाढवली आहे. आता पुन्हा एकदा त्याची किंमत वाढवण्यात आली आहे. जिओने याच वर्षी जुलैमध्ये आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली होती. जिओने रिचार्ज प्लॅनमध्ये १२-२७ टक्क्यांनी वाढ केली आहे. काही प्लॅनमध्ये असे बदल करण्यात आले होते की, यूजर्स अनलिमिटेड ५ जी डेटा वापरू शकत नाहीत. यासोबतच एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे रिचार्ज प्लॅनही महाग करण्यात आले आहेत.
जिओने केले होते रिचार्ज प्लॅन महाग
रिचार्ज प्लॅनच्या किमतीत जवळपास २७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली. वार्षिक रिचार्ज प्लॅन देखील २० टक्के करण्यात आला आहे. टॅरिफ प्लॅनमध्ये मिड-रेंज मोबाइल सेवेचाही समावेश करण्यात आला आहे. रिचार्ज महाग झाल्यानंतर युजर्सना मोठा धक्का बसला. या दरवाढीनंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. दरम्यान, एअरटेलनेही जिओसारखाच निर्णय घेऊन रिचार्ज प्लॅन महाग केले होते.