महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 06:04 PM2024-10-19T18:04:37+5:302024-10-19T18:06:40+5:30
Jio : ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने लिस्टमध्ये जास्त व्हॅलिडिटी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे.
रिलायन्स जिओकडे (Jio) ग्राहकांसाठी विविध मोबाईल रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहेत. जिओने या वर्षी जुलै महिन्यात आपल्या प्लॅन्सच्या पोर्टफोलिओमध्ये मोठे अपडेट केले होते. कंपनीने अनेक प्लॅन्स लिस्टमधून हटवले होते आणि काही प्लॅन्सच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढवल्या होत्या. मात्र, जिओकडे अजूनही असे अनेक प्लॅन्स आहेत, जे ग्राहकांना जास्त आवडतात.
दरम्यान, ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन जिओने लिस्टमध्ये जास्त व्हॅलिडिटी असलेल्या अनेक प्लॅन्सचा समावेश केला आहे. जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एकापेक्षा जास्त प्लॅन्स आहेत. जर तुम्ही जिओचे सिम वापरत असाल तर 84 दिवसांचा प्लॅन तुमच्यासाठी खूप किफायतशीर ठरू शकते.
जिओच्या लिस्टमधील परवडणारा रिचार्ज प्लॅन
जिओच्या पोर्टफोलिओमधला 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅनची किंमत 799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची ऑफर दिली जाते. तुम्ही हा प्लॅन घेतल्यास, तुम्ही एकाच वेळी जवळपास 3 महिन्यांसाठी रिचार्जच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता. फ्री कॉलिंगसोबत, जिओ आपल्या ग्राहकांना दररोज 100 फ्री एसएमएसची सुद्धा सुविधा देत आहे.
दररोज 1.5GB डेटा वापरता येणार
या 799 रुपयांच्या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा ऑफरबद्दल बोलायते झाल्यास, यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी एकूण 126GB डेटा मिळतो. यामध्ये तुम्हाला दररोज 1.5GB डेटा वापरता येणार आहे. दरम्यान, लक्षात असू द्या की, जिओचा हा प्लॅन अनलिमिटेड ट्रू 5G डेटा ऑफरसह येत नाही. त्यामुळे तुम्हाला यामध्ये फ्री 5G डेटाचा लाभ मिळणार नाही.
अतिरिक्त बेनिफिट्स
जिओ आपल्या ग्राहकांसाठी इतर प्लॅन्सप्रमाणे काही अतिरिक्त बेनिफिट्स देखील देत आहे. जर तुम्हाला चित्रपट आणि वेब सिरीज पाहण्याची आवड असेल तर त्यासाठी तुम्हाला जिओ सिनेमाचे फ्री सबस्क्रिप्शन दिले जाते. याशिवाय, प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV आणि Jio Cloud वर फ्री अॅक्सेस दिला जातो.