जिओ ग्राहकांसाठी आता नवीन सेवा, अशाप्रकारे करता येणार वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 21:01 IST2019-07-27T20:57:54+5:302019-07-27T21:01:41+5:30
सध्या Jio Saarthi हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिओ ग्राहकांसाठी आता नवीन सेवा, अशाप्रकारे करता येणार वापर!
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने जिओ सारथी (Jio Saarthi) या नावाने एक नवीन डिजिटल असिस्टंट लाँच केले आहे. हे डिजिटल असिस्टंट माय जियो अॅपवर उपलब्ध असणार आहे. Jio Saarthi एक व्हायस बेस्ड असिस्टंट आहे. ग्राहकांना आपला नंबर रिचार्ज करणे सोपे व्हावे, यासाठी हे बनवण्यात आले आहे. Jio Saarthi माय जिओ अॅपमध्ये अॅन्ड्राईड आणि आयओएससाठी 27 जुलैपासून उपलब्ध असणार आहे.
माय जियो अॅपच्या माध्यमातून रिचार्ज करण्यास त्रास होत असलेल्या ग्राहकांसाठी Jio Saarthi अॅप डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, Jio Saarthi च्या माध्यमातून जास्तीत-जास्त ग्राहक डिजिटल रिचार्ज करायला सुरुवात करतील.
Jio Saarthi डिजिटल असिस्टंट ग्राहकांना रिचार्ज करतेवेळी मार्गदर्शन करेल. ये असिस्टंट ग्राहकांना रिचार्ज कशाप्रकारे करायचे ते स्टेप-बाय-स्टेप सांगणार आहे. सध्या Jio Saarthi हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र, यानंतर 12 भाषेत Jio Saarthi आणले जाणार आहे.
कंपनीने म्हटले आहे की, ज्या जिओ ग्राहकांनी आतापर्यंत माय जियो अॅपच्या माध्यमातून रिचार्ज केले नाही. त्यांना हे अॅप दिसेल. तसेच, बाकीच्या ग्राहकांनाही दिसणार आहे आणि असिस्टेंट वापरल्यानंतर अॅप अपडेट करण्याची गरज भासणार नाही. Jio Saarthi वापरण्यासाठी ग्राहकांना अॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर रिचार्ज ऑप्शनमध्ये जाऊन Jio Saarthi असिस्टंटवर क्लिक करावे लागेल. असे केल्यानंतर Jio Saarthi असिस्टंट ग्राहकांना मार्गदर्शन करायला सुरुवात करेल.