जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 18:22 IST2025-01-13T18:20:58+5:302025-01-13T18:22:18+5:30
Jio Tower on Siachen Glacier : या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता वाढेल, सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळतील.

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आले 5G नेटवर्क; Reliance Jio ने केली मोठी कामगिरी
Jio Tower on Siachen Glacier : मुकेश अंबानी यांनी काही वर्षांपूर्वी भारतात टेलिकॉम क्रांती घडवली. त्यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स Jio ने आधी 4G आणि आता देशभरात 5G सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे, आता कंपनीने जगातील सर्वात उंच्च युद्धक्षेत्रात आपली 5G सेवा सुरू केली आहे. रिलायन्सजिओ आणि भारतीय सैन्याने एकत्रितपणे जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरवर पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे.
MERCURY OUTREACH - ANOTHER MILESTONE ACHIEVEMENT
— @firefurycorps_IA (@firefurycorps) January 13, 2025
5G Connectivity at the Highest Battlefield of the World
Fire and Fury Corps in collaboration with Jio Telecom successfully installed the first ever 5G Mobile Tower on the Siachen Glacier.
This indomitable feat is dedicated to… pic.twitter.com/laFosDStoi
सियाचीनमधील फॉरवर्ड पोस्टवर 5G टॉवर
भारतीय लष्कराच्या 'फायर अँड फ्युरी' कॉर्प्सने 'एक्स'वर ही माहिती दिली. लष्कराच्या म्हणण्यानुसार, Jioआणि भारतीय लष्कराने एकत्रितपणे सियाचीन ग्लेशियरवर हा पहिला 5G मोबाइल टॉवर यशस्वीरित्या स्थापित केला आहे. सियाचीनमधील फॉरवर्ड पोस्टवर हा टॉवर तैनात करण्यात आला आहे. 15 जानेवारीला आर्मी डेच्या आधी सियाचीन ग्लेशियरवर 4G आणि 5G सेवा सुरू करून Jio ने ही अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सियाचीन ग्लेशियरवर सेवा सुरू करणारी जिओ देशातील पहिली ऑपरेटर ठरली आहे.
टॉवर उभारणीत अनेक आव्हाने
एवढ्या उंचीवर टॉवर उभारणे अत्यंत अवघड होते. लष्कराने लॉजिस्टिकसह क्रू मेंबर्सची सुरक्षा सुनिश्चित केली. त्यामुळे जिओने त्याचे स्वदेशी फुल-स्टॅक 5G तंत्रज्ञान वापरले. फायर अँड फ्युरी सिग्नलर्स आणि सियाचीन वॉरियर्सने जिओ टीमसह उत्तर ग्लेशियरमध्ये 5G टॉवर स्थापित केले. विशेष म्हणजे, या भागातील तापमान -40 डिग्री सेल्सियस पर्यंत घसरते. थंड वारे आणि बर्फाचे वादळे येथे वारंवार येतात. अशा परिस्थितीत या टॉवर उभारणीचे काम पूर्ण केले.
या टॉवरमुळे भारतीय लष्कराची तांत्रिक क्षमता आणखी वाढेल आणि सैन्याला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे लष्कराने म्हटले आहे. 5G कनेक्टिव्हिटीद्वारे, सैनिकांना जलद आणि अधिक विश्वासार्ह दळणवळण सुविधा मिळतील.