Valentine Day साठी Jio ची बंपर ऑफर! मोफत इंटरनेट, McDonalds मध्ये फ्री जेवण अन् बरंच काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 05:06 PM2023-02-13T17:06:02+5:302023-02-13T17:07:18+5:30

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली आहे.

jio valentines day offer get free data and mcdonalds burger check detail | Valentine Day साठी Jio ची बंपर ऑफर! मोफत इंटरनेट, McDonalds मध्ये फ्री जेवण अन् बरंच काही...

Valentine Day साठी Jio ची बंपर ऑफर! मोफत इंटरनेट, McDonalds मध्ये फ्री जेवण अन् बरंच काही...

googlenewsNext

दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने (Jio) 'व्हॅलेंटाईन डे २०२३' च्या खास प्रसंगी आपल्या यूझर्ससाठी एक उत्तम जिओ ऑफर सुरू केली आहे. Jio च्या या ऑफर अंतर्गत, यूझर्सना कंपनीच्या निवडक प्लॅनसह चांगले फायदे मिळतील, जसं की जर एखादा यूझर ३४९ रुपयांचा, ८९९ किंवा मग २९९९ रुपयांचा Jio प्लॅन रिचार्ज करेल, तर त्याला अतिरिक्त डेटा, व्हॅलेडिटी आणि बरेच फायदे मिळवता येणार आहेत.

Jio Valentines Day Offer
Jio ऑफरसह, यूझरला अतिरिक्त व्हॅलिडीटी, 75GB हाय-स्पीड डेटा, 12GB हाय-स्पीड डेटा, तसंच १९९ रुपयांच्या खरेदीवर १०५ रुपये किमतीचा McDonald McAloo Tikki/चिकन कबाब बर्गर मोफत मिळवता येणार आहे. याशिवाय Ferns and Petals वर ७९९ रुपयांच्या खरेदीवर १५० रुपयांची सूट, Ixigo कडून ४५०० रुपये किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर पेटल्स फ्लॅट ७५० रुपयांची सूट मिळणार आहे.

Jio 349 Plan Details
रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅनसह, २.५ जीबी हाय-स्पीड, अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस दररोज दिले जातात. हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येतो, या प्लॅनसह यूझरना इतर फायद्यांसह 12GB अतिरिक्त डेटा मिळेल.

Jio 899 Plan Details
899 रुपयांच्या या Jio रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनीकडून 2.5GB हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्येही कंपनी यूझर्सना इतर फायद्यांसह 12 जीबी अतिरिक्त डेटा देत आहे.

Jio 2999 Plan Details
या प्लॅनसह, तुम्हाला दररोज 2.5 GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि 365 दिवसांच्या वैधतेसह दररोज 100 SMS मिळतात. व्हॅलेंटाईन डे ऑफर अंतर्गत, हा प्लॅन तुम्हाला 23 दिवसांची अतिरिक्त वैधता, 75GB अतिरिक्त डेटा, McDonalds, Fern & Petal सह 12GB अतिरिक्त डेटा आणि फ्लाइट बुकिंगवर 750 रुपये सूट देत आहे.

Web Title: jio valentines day offer get free data and mcdonalds burger check detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ