Jio घालणार Laptop सेगमेंटमध्ये धुमाकूळ, कमी किंमतीत भारी फीचर्ससह येतोय JioBook
By सिद्धेश जाधव | Published: February 4, 2022 07:52 PM2022-02-04T19:52:13+5:302022-02-04T19:53:09+5:30
JioBook लॅपटॉपच्या हार्डवेयरला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल आणि डेल, लेनवो, एचपी सारख्या कंपन्यांना टक्कर देईल.
Reliance Jio च्या लॅपटॉपच्या बातम्या गेले कित्येक दिवस येत आहेत. कंपनी कमी किंमतीत लॅपटॉप लाँच करण्याची तयारी केल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्टनुसार, JioBook लॅपटॉपच्या हार्डवेयरला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल आणि डेल, लेनवो, एचपी सारख्या कंपन्यांना टक्कर देईल.
टिपस्टर मुकुल शर्मानं या लॅपटॉपची एक लिस्टिंग शेयर केली आहे. या लिस्टिंगमध्ये याचा प्रोडक्ट आयडी 400830078 आहे. यात Windows 10 OS देण्यात येईल असं लिस्टिंगमधून समजलं आहे. याआधी हा एक अँड्रॉइड लॅपटॉप असेल, अशी बातमी आली होती. लाँच झाल्यावर हा ओएस विंडोज 11 वर देखील अपडेट केला जाऊ शकतो.
लिस्टिंगमधून जियोच्या Emdoor Digital Technology Co LTD या व्हेंडरचा खुलासा झाला आहे. म्हणजे Jio या कंपनीकडून लॅपटॉप बनवून घेऊन आपल्या ब्रॅंडिंगनं विकू शकते. JioBook याआधी BIS वर देखील लिस्ट झाला होता. तसेच गीकबेंच बेंचमार्किंग अॅप्लिकेशनवरून देखील या लॅपटॉपच्या काही प्रमुख स्पेक्सची माहिती मिळाली आहे. या लॅपटॉपचा गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1,178 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 4,246 पॉईंट्स मिळाले आहेत. यात मीडियाटेक MT8788 चिपसेट देण्यात येईल. सोबत 2GB रॅम देण्यात येईल.
हे देखील वाचा:
तुम्ही घोरता कि नाही सांगेल हा Smartwatch; सिंगल चार्जवर 14 दिवस चालणार Oppo Watch Free
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट