स्वस्त लॅपटॉप आणण्यासाठी जियो सज्ज; लाँचपूर्वीच JioBook Laptop वेबसाईटवर लिस्ट  

By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 06:17 PM2021-09-13T18:17:53+5:302021-09-13T18:20:49+5:30

JioBook Laptop price: JioBook laptop भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाल्यामुळे हा लॅपटॉप लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. कंपनीने मात्र या लॅपटॉपच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही

Jiobook laptop india launch soon spotted on bis listing  | स्वस्त लॅपटॉप आणण्यासाठी जियो सज्ज; लाँचपूर्वीच JioBook Laptop वेबसाईटवर लिस्ट  

स्वस्त लॅपटॉप आणण्यासाठी जियो सज्ज; लाँचपूर्वीच JioBook Laptop वेबसाईटवर लिस्ट  

Next
ठळक मुद्देJio लॅपटॉप मध्ये HD (1,366×768 पिक्सल) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. JioBook मध्ये JioStore, JioMeet, JioPages माइक्रोसॉफ्ट टीम्स, माइक्रोसॉफ्ट एज आणि ऑफिस असे अ‍ॅप प्री-इंस्टॉल मिळतील.

आपल्या किफायती सेवांसाठी भारतीय टेलिकॉम कंपनी जियो नेहमीच चर्चेत असते. परंतु सध्या कंपनी स्वस्त टेक प्रोडक्टसाठी मथळ्यांमध्ये झळकत आहे. लवकरच Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त 4G फोन घेऊन येणार आहे. तसेच आता कंपनीचा आगामी स्वस्त Laptop सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. याआधी देखील JioBook laptop च्या बातम्या आल्या होत्या. परंतु आता हा जियोबुक लॅपटॉप Bureau of Indian Standards (BIS) वेबसाईटवर दिसला आहे.  

JioBook laptop भारतीय सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाल्यामुळे हा लॅपटॉप लवकरच भारतीयांच्या भेटीला येईल, अशी चर्चा आहे. कंपनीने मात्र या लॅपटॉपच्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. BIS लिस्टिंगमधून या लॅपटॉपच्या मॉडेल नंबर्सची माहिती मिळाली आहे. हा लॅपटॉप तीन मॉडेलमध्ये सादर केला जाईल. याव्यतिरिक्त या नोटबुकची कोणतीही माहित समोर आली नाही.  

JioBook ची BIS सर्टिफिकेशन वेबसाईटवरील लिस्टिंग टिपस्टर मुकुल शर्माने शेयर केली आहे. या लिस्टिंगनुसार Jio लॅपटॉपचे तीन मॉडेल भारतीयांच्या भेटीला येतील. हे तिन्ही मॉडेल्स NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM अश्या मॉडेल नंबर्ससह लिस्ट करण्यात आले आहेत.  

JioBook चे संभाव्य स्पेसीफाकेशन्स  

याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, Jio लॅपटॉप मध्ये HD (1,366×768 पिक्सल) रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले दिला जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी स्नॅपड्रॅगन 665 SoC ची मदत घेतली जाईल, तर कनेक्टिव्हिटीसाठी स्नॅपड्रॅगन X12 4G मॉडेम वापरला जाईल. या लॅपटॉपमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB पर्यंत eMMC ऑनबोर्ड स्टोरेजची मिळू शकते. तसेच यात एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथचा समावेश असेल. यात क्वॉलकॉमच्या ऑडिओ चिपचा देखील वापर करण्यात येईल. JioBook मध्ये JioStore, JioMeet, JioPages माइक्रोसॉफ्ट टीम्स, माइक्रोसॉफ्ट एज आणि ऑफिस असे अ‍ॅप प्री-इंस्टॉल मिळतील. 

Web Title: Jiobook laptop india launch soon spotted on bis listing 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.