जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

By सिद्धेश जाधव | Published: August 16, 2021 12:29 PM2021-08-16T12:29:40+5:302021-08-16T12:36:07+5:30

JioPhone Next Price: JioPhone Next हा जगातील सर्वात किफायतशीर स्मार्टफोन असेल, असा दावा रिलायन्स जियोने केला आहे. हा फोन 10 सप्टेंबरपासून भारतीयांच्या भेटीला येणार आहे.  

Jiophone next specifications tipped qualcomm qm215 soc 13 megapixel single rear camera  | जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

जगातील सर्वात किफायतशीर 4G फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या JioPhone Next ची माहिती 

googlenewsNext
ठळक मुद्देमिशाल रहमान यांनी JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स ट्विटरवर शेयर केले आहेत.JioPhone Next चा मॉडेल नंबर LS-5701-J आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा मिळू शकतो.

जूनमध्ये झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत कंपनीने आपल्या आगामी 4G स्मार्टफोन JioPhone Next ची घोषणा केली होती. कंपनीने सांगितले होते कि हा जगातील सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोन असेल आणि हा फोन 10 सप्टेंबर रोजी भारतात खरेदीसाठी उपलब्ध होईल. आता JioPhone Next च्या लाँचपूर्वी या फोनचे स्पेसिफिकेशन्स एका लीकच्या माध्यमातून समोर आले आहेत. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा चिपसेट मिळणार आहे.  

टेक वेबसाईट XDA Developers चे एडिटर-इन-चीफ मिशाल रहमान यांनी JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स ट्विटरवर शेयर केले आहेत. मिशाल यांनी फोनच्या बूट स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. या स्क्रीन शॉटमध्ये “JioPhone Next Created with Google” असे बूट अ‍ॅनिमेशन दिसत आहे. त्याचबरोबर या फोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील सांगण्यात आली आहे.  

हे देखील वाचा: अरे वा! मोफत मिळणार Jio Phone; कंपनीने सादर केल्या दोन ऑफर्स

JioPhone Next चे लीक स्पेसिफिकेशन्स  

JioPhone Next चा मॉडेल नंबर LS-5701-J आहे. या फोनमधील डिस्प्ले 720x1440 पिक्सल रिजोल्यूशनसह सादर काळ जाऊ शकतो. प्रोसेसिंगसाठी यात 64-बिट क्वॉडकोर Qualcomm QM215 SoC देण्यात येईल, त्याचबरोबर Qualcomm Adreno 308 GPU मिळेल. हा फोन LPDDR3 रॅम आणि eMMC 4.5 स्टोरेजला सपोर्ट करेल. हा एक लो एन्ड स्मार्टफोन असल्यामुळे यात Android 11 ओएसचे Go Edition बघायला मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ v4.2, GPS आणि Qualcomm Snapdragon X5 LTE मॉडेम मिळू शकतो.  

हे देखील वाचा: कोणत्याही डेली लिमिटविना वापरा इंटरनेट; हे आहेत Jio, Airtel आणि Vi चे बेस्ट प्लॅन

फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा मिळू शकतो. तसेच JioPhone Next मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये काही ऍप्सचे गो व्हर्जन प्री-इन्स्टॉल मिळतील, ज्यात DuoGo आणि Snapchat इंटीग्रेशनसह Google Camera Go चा समावेश असेल. या फोनची किंमत किती असेल याची अचूक माहिती मिळाली नाही. परंतु हा फोन 4,000 पेक्षा कमी किंमतीत बाजारात सादर होऊ शकतो, अशी चर्चा आहे.  

Web Title: Jiophone next specifications tipped qualcomm qm215 soc 13 megapixel single rear camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.