सर्वात किफायतशीर 4G स्मार्टफोनचे फीचर्स आले समोर; प्रगती ओएससह लाँच होणार JioPhone Next
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 05:56 PM2021-10-25T17:56:09+5:302021-10-25T17:59:14+5:30
Jio Phone Next Price Launch Date In India: Jio Phone Next प्रगती ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात येईल. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अँड्रॉइडद्वारे बनवण्यात आली आहे.
गेल्याच आठवड्यात बातमी आली होती कि Reliance Jio चा सर्वात स्वस्त Jio Phone Next 4G Smartphone 4 नोव्हेंबरपर्यंत बाजारात सादर केला जाईल. Diwali 2021 च्या निम्मिताने सादर होणाऱ्या या फोनच्या मेकिंगचा एक व्हिडीओ कंपनीने शेयर केला आहे. या व्हिडीओमधून जियोफोन नेक्स्टच्या लाँच मागील उद्देश सांगण्यात आला आहे. त्याचबरोबर ही कंपनीने फोनच्या काही फीचर्सची देखील माहिती दिली आहे.
Jio Phone Next स्पेक्स आणि फीचर्स
जियोफोन नेक्स्ट प्रगती ऑपरेटिंग सिस्टमसह बाजारात येईल. ही ऑपरेटिंग सिस्टम गुगल अँड्रॉइडद्वारे बनवण्यात आली आहे. प्रगती ओएसला वेळोवेळी अपडेट दिले जातील, यात सिक्योरिटी अपडेट्सचा देखील समावेश असेल. तसेच या फोनमध्ये गुगल अॅप्स प्रीलोडेड मिळतील. या फोनमध्ये क्वालकॉमने तयार केलेला प्रोसेसर देण्यात येईल. जो ऑप्टिमाइज्ड कनेक्टिविटी अँड लोकेशन टेक्नॉलोजी, ऑडियो आणि बॅटरीमध्ये चांगली परफॉर्मन्स देईल.
Jio Phone Next मध्ये व्हॉइस असिस्टंट फिचर देण्यात येईल. फक्त आवाजाच्या मदतीने या फोनमधील बेसिक फंक्शन्स वापरता येतील. या फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा असेल. जो विविध फोटोग्राफी मोड्सना सपोर्ट करेल. ज्यात पोर्टेट मोडचा देखील समावेश असेल.
Jio Phone Next Price In India
कंपनीने या फोनच्या किंमतीची कोणतीही माहिती दिली नाही. परंतु हा फोन जगातील सर्वात किफायतशीर 4G फोन असेल असा दावा केला आहे. अनेक अंदाज बांधले जात आहेत, परंतु हा फोन 5000 भारतीय रुपयांच्या आसपास आत सादर केला जाईल असे स्पेक्सवरून वाटत आहे.