Jio True 5G Service : दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 02:53 PM2022-10-21T14:53:28+5:302022-10-21T14:55:20+5:30

जिओची 5G टेक्नॉलॉजी 700MHz बँडवर अवलंबून आहे आणि ही भारतात SA (स्टँडअलोन) 5G सेवा देणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Jio's 5G speed will be available from Diwali, the benefit of Welcome Offer can be availed how to get invite for welcome offer | Jio True 5G Service : दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ

Jio True 5G Service : दिवाळीपासून मिळणार जिओची 5G स्पीड, असा घेता येईल Welcome Offer चा लाभ

Next

भारतातील सर्वात मोठी सब्सक्रायबर बेस असलेली टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने काही निवडक शहरांमध्ये दिवाळीपासून 5G सेवा मिळायला सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे. Jio True 5G लॉन्चसोबतच कंपनी 5G नेटवर्कवर ग्राहकांना 1Gbps पर्यंतची स्पीड देणार आहे. जर आपली इतरांच्या आधी जिओच्या 5G स्पीडचा फायदा घेण्याची इच्छा असेल तर याच्या वेलकम ऑफरचा फायदा घेऊ शकता.

जिओची 5G टेक्नॉलॉजी 700MHz बँडवर अवलंबून आहे आणि ही भारतात SA (स्टँडअलोन) 5G सेवा देणारी एकमेव कंपनी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5Gची टेस्टिंग सुरू केले आहे. मात्र, आपण या शहरांमध्ये राहत असाल तरीही आपल्याला या सेवेचा लाभ घेण्यासाठी एका विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागेल. अर्थात या सेवेचा लाभ अपोआप मिळणार नाही.

सध्या इन्व्हाइट-ओनली आहे जिओची 5G सेवा -
रिलायन्स जिओची 5G सेवा काही निवडक शहरांमध्ये इन्व्हाइट-ओनली मोडमध्ये मिळेल. अर्थात आपल्याला 5G सेवेचा लाभ घेण्यासाठी एका इन्व्हाइटची आवश्कता असेल. या सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण वरील चार शहरांपैकी एका शहरात असणे आवश्यक आहे. याच बरोबर आपल्याकडे 5G-एनेबल्स स्मार्टफोन असणेही आवश्यक आहे. यानंतर, रियलमी, वनप्लस, व्हीवो, सॅमसंग, शाओमी आणि iQOO फोन यूजर्स वेलकम ऑफरचा भाग बनण्याचा प्रयत्न करू शकतात. 

आपल्याला सर्वप्रथम 5G फोनमध्ये MyJio App इंस्टॉल करावे लागेल. येथे अॅप ओपोन केल्यानंतर आणि आपल्या जिओ नंबरच्या सहाय्याने लॉगिन केल्यानंतर, आपल्याला होम-स्क्रीन दिसेल. जर आपण जिओची 5G सेवा टेस्ट सुरू असलेल्या शहरात राहत असाल तर आपल्याला सर्वात वर 'Jio Welcome Offer' लिहिलेले दिसेल. या कार्डवर टॅप केल्यानंतर आपल्याला 5G सेवेचा लाभ घेता येईल आणि आपल्याला एनरोल करण्यात येईल.

स्क्रीनवर दाखवला जाईल कन्फर्मेशन मेसेज -
टॉप कार्डवर टॅप केल्यानंतर, स्क्रीनवर मेसेज दिसेल. "धन्यवाद! जिओ ट्रू 5G सोबतचा आपला प्रवास सुरू होत आहे." खरे तर, जर यूजरचा मोबाईल 5G कंपेटिबल असेल आणि जिओच्या 5G बँड्सला सपोर्ट करत असले तर त्याला 'जिओ वेलकम ऑफरचे इन्व्हाइट पाठवले जाईल.' हे इन्व्हिटेशन मिळाल्यानंतरच 5G इंटरनेट स्पीड्सचा फायदा मिळायला सुरुवात हेईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Web Title: Jio's 5G speed will be available from Diwali, the benefit of Welcome Offer can be availed how to get invite for welcome offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.