Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 08:15 PM2024-10-17T20:15:05+5:302024-10-17T20:24:10+5:30

भारतात 5G युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Jio's dominance continues; 5G users grow exponentially, no impact on expensive recharges... | Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...

Jio चा दबदबा कायम; 5G युजर्स झपाट्याने वाढले, महाग रिचार्जचा कुठलाही परिणाम नाही...


Jio 5G : भारतात 5G युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 2022 मध्ये देशात 1 कोटी 5G युजर्स होते, तर आता ही संख्या 18 कोटींवर पोहोचली आहे. रिलायन्स Jio आणि Airtel ने अतिशय वेगाने 5G तंत्रज्ञानाचा विस्तार केल्यामुळे यात झपाट्याने वाढ होत आहे. सर्वात वेगवान 5G सेवा सुरू करणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे. देशातील 98 टक्के जिल्ह्यांमध्ये 5G सेवा पोहोचली आहे. 

5G युजर्स झपाट्याने वाढले
ट्रायच्या नवीन अहवालानुसार, देशातील मोबाईल युजर्सची संख्या 120 कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच, इंटरनेट युजर्सच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. रिलायन्सजिओने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. TRAI च्या नवीन अहवालानुसार, देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या 5G युजर्सच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. Jio च्या 5G युजर्सची संख्या 13 कोटींवरुन 14.7 कोटी झाली आहे.

जिओचा नफा वाढला
खासगी दूरसंचार कंपन्यांनी जुलैमध्ये मोबाइलचे दर वाढवल्यामुळे अनेक युजर्स सरकारी कंपनी BSNL कडे वळले आहेत. पण, याचा Jio वर फारसा परिणाम पडलेला नाही. उलट कंपनीचा प्रति ग्राहक सरासरी महसूल (ARPU) 181.7 रुपयांवरुन 195.1 रुपयांपर्यंत वाढला आहे. यामुळे दूरसंचार कंपनीचा निव्वळ नफाही 6,536 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. युजरबेस कमी झाल्यामुळे फारसे नुकसान झाले नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे संपूर्ण लक्ष आता सर्वोत्तम 5G नेटवर्क देण्यावर आहे. 

Web Title: Jio's dominance continues; 5G users grow exponentially, no impact on expensive recharges...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.