जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

By शेखर पाटील | Published: September 7, 2017 01:07 PM2017-09-07T13:07:01+5:302017-09-07T13:08:47+5:30

जिवी मोबाईल्सने जिवी एनर्जी ई३ (३,३३३ रूपये); जिवी एनजी ई१२ (३,६९९); जिवी प्राईम पी३०० (४,९९९); जिवी प्राईम पी३९० (५७९९) तसेच जिवी ग्रँड ३००० (६,५९९ रूपये) असे एकंदरीत पाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत

Jive Mobiles's affordable Four-G smartphone | जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

जिवी मोबाइल्सचे किफायतशीर फोर-जी स्मार्टफोन

ठळक मुद्देहे पाचही स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेतग्राहकाला ‘फ्री रिप्लेसमेंट वॉरंटी’ देण्यात आली आहे याच्या जोडीला स्मार्टफोन खरेदी केल्यापासून १११ दिवसांपर्यंत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटीदेखील मिळणार आहे

जिवी मोबाईल्स या कंपनीने भारतात पाच स्मार्टफोन लाँच केले असून त्याचे मूल्य ३,३३३ रूपयांपासून सुरू होणारे आहेत. जिवी मोबाईल्सने जिवी एनर्जी ई३ (३,३३३ रूपये); जिवी एनजी ई१२ (३,६९९); जिवी प्राईम पी३०० (४,९९९); जिवी प्राईम पी३९० (५७९९) तसेच जिवी ग्रँड ३००० (६,५९९ रूपये) असे एकंदरीत पाच स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर केले आहेत. हे पाचही स्मार्टफोन देशभरातील शॉपीजमधून ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. सर्व स्मार्टफोन ‘डबल गॅरंटी’ने युक्त असतील. अर्थात ग्राहकाला ‘फ्री रिप्लेसमेंट वॉरंटी’ देण्यात आली असून याच्या जोडीला स्मार्टफोन खरेदी केल्यापासून १११ दिवसांपर्यंत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटीदेखील मिळणार आहे. जिवी मोबाईल्सच्या या सर्व मॉडेलमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. तर उर्वरित फिचर्समध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्ल्यु-टुथ आदी फिचर्स देण्यात आलेले आहेत.

जिवी एनर्जी ई३

या मॉडेलमध्ये चार इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८०० पिक्सल्स म्हणजेच डब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम ५१२ एमबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ४ जीबी असून ते ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा ५ व २ मेगापिक्सल्सचा असून १८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, गोल्ड आणि ब्ल्यू या रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे.

जिवी एनजी ई१२ 

या मॉडेलमध्ये चार इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८०० पिक्सल्स म्हणजेच डब्ल्यूव्हिजीए क्षमतेचा डिस्प्ले असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा ५ व २ मेगापिक्सल्सचा असून २३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि व्हाईट या रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे.

जिवी प्राईम पी३००

हा स्मार्टफोन पाच इंच आकारमानाचा आणि ४८० बाय ८५४ पिक्सल्स म्हणजेच एफडब्ल्यूव्हिजीए क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ८ जीबी असून ते ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा ८ व ५ मेगापिक्सल्सचा असून २५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन ग्रे ब्लॅक आणि गोल्ड ब्लॅक या रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे.

जिवी प्राईम पी ३९०

हा स्मार्टफोन पाच इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज असेल. याची रॅम एक जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा ८ व ५ मेगापिक्सल्सचा असून २४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन ग्रे ब्लॅक आणि गोल्ड ब्लॅक या रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.

जिवी ग्रँड ३०००

हा स्मार्टफोन ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेच्या २.५ डी डिस्प्लेने सज्ज असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यातील मुख्य व फ्रंट कॅमेरा १३ व ५ मेगापिक्सल्सचा असून ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.

Web Title: Jive Mobiles's affordable Four-G smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.