सोनी कंपनीच्या या फ्लॅगशीप स्मार्टफोनवर मिळतोय जंबो डिस्काऊंट !
By शेखर पाटील | Published: December 22, 2017 01:37 PM2017-12-22T13:37:20+5:302017-12-22T13:37:55+5:30
सोनी कंपनीच्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनवर तब्बल १०,००० ते १३,६०० रूपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.
सोनी कंपनीच्या सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनवर तब्बल १०,००० ते १३,६०० रूपयांपर्यंत डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस हा स्मार्टफोन या वर्षाच्या एप्रिल महिन्यात भारतीय ग्राहकांसाठी ४९,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता. हे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले होते. आता याचे मूल्य तब्बल १३,६०० रूपयांनी कमी करण्यात आले असून हा स्मार्टफोन ३६,३९९ रूपयात अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला आहे. सध्या फक्त याच्या ब्लॅक रंगातील मॉडेलला हा डिस्काऊंट लागू करण्यात आला आहे. तर याचे आईस ब्ल्यू आणि वार्म सिल्व्हर हे व्हेरियंटस् ३७,७५० आणि ३७,४९५ रूपयात अमेझॉनवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे फ्लिपकार्टवर सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या मॉडेलचे सर्व व्हेरियंट ३,९९९० रूपयात उपलब्ध आहेत. म्हणजे या स्मार्टफोनवर आता १०,००० ते १३,६०० रूपयांच्या दरम्यानचा डिस्काऊंट देण्यात आला आहे.
सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस मॉडेलची खासियत म्हणजे यात १९ मेगापिक्सल्स क्षमतेचा मोशन आय कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने ९६० फ्रेम्स प्रतिसेकंद या गतीने सुपर स्लो मोशन या प्रकारातील व्हिडीओ चित्रीकरण करणे शक्य आहे. ते सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.
सोनी एक्सपेरिया एक्सझेडएस या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकाराचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा ट्रायल्युमिनस डिस्प्ले असेल. याच अत्यंत शक्तीशाली असा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८२० प्रोसेसर आहे. याची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. हे मॉडेल डस्ट आणि वॉटरप्रुफ असेल. यात क्युनोव्हो अॅडाप्टीव्ह चार्जींग व क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानाने युक्त असणारी २९०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी आदी पर्यायांची व्यवस्था आहे. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्झीमिटी सेन्सर आदी महत्वाचे फिचर्सही आहेत.