केवळ पाच मिनिटांत रियलमी 2 झाला 'आऊट ऑफ स्टॉक'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 06:20 PM2018-09-05T18:20:34+5:302018-09-05T18:21:10+5:30
5 मिनिटांत तब्बल 2 लाख फोन विकले गेले आहेत.
नवी दिल्ली : ओप्पोचा नवा ब्रँड रियलमीने परवडणाऱ्या श्रेणीतील स्मार्टफोन रियलमी 2 हा स्मार्टफोन नुकताच फ्लॅश सेलद्वारे फ्लिपकार्टवर विकण्यात आला. हा फोन केवळ पाच मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. 5 मिनिटांत तब्बल 2 लाख फोन विकले गेले आहेत.
भारतीय बाजारपेठांमध्ये परवडणारे मोबाईल उतरवत चीनच्या कंपन्यांनी जवळपास सर्वच बाजारपेठ काबीज केली आगे. शाओमी, लिनोव्हो, ओप्पो, व्हीवोसारख्या मोबाईल कंपन्यांनी यामध्ये आघाडी घेतली आहे. कमी किंमतीमध्ये जास्त फिचर्स असलेले मोबाईल या कंपन्या बाजारात आणत आहेत. तसेच या कंपन्या त्यांचे सब ब्रँड बनवूनही बाजारात उतरल्या आहेत. शाओमीचा सबब्रँड रेडमी, पोको ही त्याचीच उदाहरणे आहेत. यामुळे ओप्पो कंपनीनेही नवा ब्रँड रियलमी बाजारात आणला आहे.
काऊंटर पॉईंट 2018च्या अहवालानुसार रियलमी ऑनलाईन स्मार्टफोन विक्रीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. केवळ एक महिन्यात या ब्रँडने बाजारपेठेचा 4 टक्के हिस्सा काबीज केला आहे. रियलमीच्या या फोनची किंमत 8999 ते 10999 रुपये आहे. या फोनला आयफोनसारखी नॉच स्क्रीन आहे. तसेच ड्युअल कॅमेऱ्यासह रॅम, मेमरी स्पेसही चांगली दिली आहे.