स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Published: June 15, 2021 11:31 AM2021-06-15T11:31:59+5:302021-06-15T18:01:40+5:30

Karbonn X21 Launch: Karbonn X21 मध्ये 5.45 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1440 x 720 पिक्सल आहे. 

Karbonn x21 smartphone launched in india with unisoc processor price rs 4999   | स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन 

स्वदेशी कंपनीची कमाल! 5,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला स्मार्टफोन 

Next

भारतीय मोबाईल निर्माता कंपनी Karbonn ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Karbonn X21 लाँच केला आहे. ‘हर हाथ में स्मार्टफोन’ या टॅगलाईनसह हा फोन कंपनीने बाजारात आणला आहे. फिचर फोन वापरणाऱ्या लोकांना स्मार्टफोनवर अपग्रेड करणे सोप्पे जावे म्हणून कंपनीने या फोनची किंमत कमी ठेवली आहे. हा स्मार्टफोन Flipkart वर उपलब्ध होईल. (Karbonn X21 smartphone launched in india in Rs 4999) 

Karbonn X21 ची किंमत  

Karbonn X21 ची किंमत 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. कार्बनचा हा स्वस्त फोन अ‍ॅक्वा ग्रीन आणि मिडनाइट ब्लू कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.  

Karbonn X21 चे स्पेसिफिकेशन्स  

Karbonn X21 मध्ये 5.45 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1440 x 720 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन Android 10 च्या गो एडीशन वर चालतो. फोनमध्ये UNISOC SC9863 चिपसेट देण्यात आला आहे. 2 जीबी रॅमसह यात 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हि स्टोरेज माइक्रो एसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅश देखील देण्यात आला आहे. कार्बनच्या या नवीन बजेट फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. विशेष म्हणजे कंपनीने सेल्फी कॅमेऱ्यासोबत देखील एलईडी फ्लॅश दिला आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये 3,000mAh ची बॅटरी आहे.  

Web Title: Karbonn x21 smartphone launched in india with unisoc processor price rs 4999  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.