‘या’ राज्यात Dream 11, MPL सारख्या फँटसी गेम्सवर बंदी; Gambling Games च्या कायद्यात बदल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:56 PM2021-10-06T16:56:24+5:302021-10-06T16:58:09+5:30

Karnataka gambling law: कर्नाटक राज्यात MPL, Paytm First Halaplay, Ace2Three, RummyCulture आणि BalleBaazi सारख्या फॅन्टसी स्पोर्ट गेम्सवर बंदी घालण्यात आली आहे.  

Karnataka gambling law mpl other gaming apps block users from playing real money games  | ‘या’ राज्यात Dream 11, MPL सारख्या फँटसी गेम्सवर बंदी; Gambling Games च्या कायद्यात बदल 

‘या’ राज्यात Dream 11, MPL सारख्या फँटसी गेम्सवर बंदी; Gambling Games च्या कायद्यात बदल 

googlenewsNext

खरे पैसे वापरून खेळता येणाऱ्या ऑनलाईन गेम्सनी कर्नाटक राज्यातील युजर्सना ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने 5 ऑक्टोबरपासून ऑनलाईन गॅम्बलिंग कायद्यात बदल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 70 पेक्षा जास्त गेम्स असणाऱ्या Mobile Premier League (MPL) या गेमिंग प्लॅटफॉर्मने आपल्या अटी आणि शर्थींमध्ये बदल करून कर्नाटकातील युजर्सवर बंदी घातली आहे.  

कर्नाटकात MPL सारख्या ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. मंगळवारी तिथल्या राज्य सरकारने नवीन कायदा लागू केला आहे, ज्यात जुगार संबंधित सर्व ऑनलाइन गेम्सवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. गेमिंग कंपन्या या कायद्याच्या विरोधात कोर्टात जाण्याची तयारी करत आहेत. All India Gaming Federation चे चीफ एग्जिक्यूटिव Roland Landers यांनी सर्व गेम्स मिळून राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे NDTV ला सांगितले आहे. 

फँटसी गेमिंग अ‍ॅप्स फॅन्टसी क्रिकेट आणि फुटबॉल गेम ऑफर करतात. ज्यात तुम्ही खरे पैसे वापरून पैसे मिळवू शकता. Halaplay, Ace2Three, RummyCulture आणि BalleBaazi सारख्या अ‍ॅप्सनी राज्यातील युजर्सना खरे पैसे वापरून गेम खेळण्यास बंदी घातली आहे. काही अ‍ॅप्समध्ये फ्री गेम प्ले उपलब्ध आहेत परंतु पेड गेम्स खेळात येत नाहीत. Dream11 या क्षेत्रात आघाडीवर आहे. परंतु Paytm First Games आणि MPL प्रमाणे ड्रीम इलेव्हन कर्नाटकात अजूनही वापरता येत आहे.  

Web Title: Karnataka gambling law mpl other gaming apps block users from playing real money games 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.