मोबाइलमधील डेटा असा ठेवा सुरक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 06:14 AM2022-06-20T06:14:31+5:302022-06-20T06:15:11+5:30
Mobile Data : सध्या आपली सर्व महत्त्वाची माहिती मोबाइल फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये असते. मोबाइल, लॅपटॉपमुळे जीवनाला मोठी गती येत असली तरीही एक छोटीशी चूकसुद्धा महागातपडू शकते. आपल्या मोबाइलमधील डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी काही उपाय...
सध्या आपली सर्व महत्त्वाची माहिती मोबाइल फोन, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये असते. मोबाइल, लॅपटॉपमुळे जीवनाला मोठी गती येत असली तरीही एक छोटीशी चूकसुद्धा महागातपडू शकते. आपल्या मोबाइलमधील डेटा कसा सुरक्षित ठेवावा यासाठी काही उपाय...
डेटा सुरक्षेसाठी उपाय
मोबाइलमधील डेटा संरक्षणासाठी, तुमचा १५ अंकी आयएमईआय क्रमांक लिहून ठेवा. मोबाइल फोन चोरीला गेल्यास/हरवल्यास पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी हा नंबर उपयोगी येतो. फोनसाठी ऑटोलॉक वापरा किंवा तुम्ही कीपॅड लॉक टाका.
स्पॅम मेसेजकसा ब्लॉक करायचा?
स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम मेसेजिंग ॲपवर जा आणि स्टार्ट टाइप करून १९०९ वर पाठवा. दुसरा मार्ग म्हणजे तुमच्या फोनवरून १९०९ वर कॉल करा. फोनसाठी डू नॉट डिस्टर्ब सेवा सक्रिय करा. या दोन्ही पद्धतींमुळे तुमच्या फोनवर येणारे कॉल्स आणि मेसेज मोठ्या प्रमाणात कमी होतील.
सर्व कुकीज स्वीकाराव्यात?
सर्व प्रकारच्या वेबसाइटवरून कुकीज ॲक्सेप्ट करू नका. कुकीजच्या मदतीने तुमची सर्व महत्त्वाची माहितीही त्या वेबसाइटवर जाते. नंतर ते त्याचा गैरवापरही करू शकतात. हे टाळण्यासाठी, केवळ विश्वसनीय वेबसाइटच्या कुकीज स्वीकारल्या पाहिजेत.
ॲपवर ॲक्सेस मिळत नाही, तक्रार करायची कुठे?
फोटो, मेसेज यांचा ॲक्सेस द्यायचा की नाही याचा पूर्ण निर्णय तुमचा आहे. तुम्ही जितका जास्त प्रवेश द्याल तितका तुमच्या डेटाला धोका जास्त असेल. त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग नाही.
पासवर्ड टाका...
- डिव्हाइस चोरीला गेल्यास सिमचा गैरवापर टाळावा यासाठी सिम कार्ड लॉक करण्यासाठी पिन वापरा.
- मेमरी कार्ड माहिती संरक्षित करण्यासाठी पासवर्ड वापरा.
- तुमच्या मोबाइलला कुठेही सोडू नका.
- वापरात नसताना ॲप्लिकेशन्स (कॅमेरा, ऑडिओ/व्हिडिओ प्लेअर) आणि कनेक्शन्स (ब्लूटूथ, इन्फ्रारेड, वाय-फाय) बंद करा. डेटाचा नियमित बॅकअप घ्या.