तंत्रज्ञानाची किमया! देशातील पहिल्या बँकिंग मेटाव्हर्सची घोषणा; जाणून घ्या, कियाव्हर्स म्हणजे नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 10:40 AM2022-06-03T10:40:46+5:302022-06-03T10:43:36+5:30
Kiyaverse : "मेटाव्हर्स बँकांना मानवी स्पर्शासह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी देते. ज्यामुळे ग्राहकांशी संवाद वाढेल."
मुंबई - बँकेशी संबंधित काही व्यवहार करायचे असल्यास सहसा आपल्याला बँकेत जावं लागतं. पण तुम्हाला जर कोणी घरबसल्या बँकिंगबाबतची सर्व माहिती मिळेल असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. कारण आता जागतिक स्तरावर वित्तीय संस्था आणि सरकारांना सेवा देणार्या सर्वात नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधा पुरवठादारांपैकी एक असलेल्या Kiya.ai ने कियाव्हर्स (Kiyaverse) हे भारतातील पहिलं बँकिंग मेटाव्हर्स (Metaverse) सादर करत असल्याची घोषणा केली आहे. खासकरून मेटाव्हर्स बँकांना मानवी स्पर्शासह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी देतं.
Kiya.aiचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मिरजनकर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. "मेटाव्हर्स बँकांना मानवी स्पर्शासह अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी देते. ज्यामुळे ग्राहकांशी देखील संवाद वाढेल. कियाव्हर्स ग्राहकांना डिजिटल बँकिंग युनिट्स, मोबाईल, लॅपटॉप, व्हीआर हेडसेट आणि मिक्स्ड रिएलिटी एनवायरनमेंट वापरण्यास सक्षम करेल. हे व्यासपीठ बँकिंग सेवांना वास्तविक जगातून आभासी जगात आणेल" असं राजेश मिरजनकर यांनी म्हटलं आहे.
पहिल्या टप्प्यात कियाव्हर्स बँकांना त्यांचे स्वतःचे मेटाव्हर्स ग्राहक, भागीदार आणि कर्मचाऱ्यांना सेवेद्वारे विस्तारित करण्याची परवानगी देईल, ज्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर, पीअर अवतार आणि रोबो-सल्लागार यांचा समावेश असेल. कियाव्हर्सने वेब3.0 वातावरणात ओपन फायनान्स सक्षम करण्यासाठी NFT च्या स्वरूपात टोकन्स ठेवण्याची आणि CBDC ला समर्थन देण्याची योजना आखली आहे. Metaverse वर सुपर-एप्स आणि मार्केटप्लेस सक्षम करण्यासाठी कियाव्हर्स त्याच्या Open API कनेक्टर्सना गेटवेसह इंटरफेस करेल. तसेच य़ामुळे आगामी काळात गुंतवणूक योजना समजून घेण्यासाठी, संभाषणासाठी एखाद्या सल्लागाराला भेटण्याचीही गरज भासणार नाही. ही सर्व कामं व्हर्चुअली करता येतील.
किया.एआय ही जागतिक स्तरावर वित्तीय संस्था आणि सरकारांना सेवा देणार्या सर्वात नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधा पुरवठादारांपैकी एक आहे. यासोबतच व्यवसायांना त्याच्या प्रगत डिजिटल सुविधा, मल्टी-एक्सपीरियन्स आणि ओम्निचॅनल बँकिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (RPA) आणि डेटा एनालिटिक्स यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या श्रेणीद्वारे बदलण्यात मदत करते. किया. एआयची १२ कार्यालये आहेत आणि आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील ५६ देशांमध्ये ५०० हून अधिक उद्योगांना सेवा देण्यात येते. अधिक माहितीसाठी तुम्ही https://www.kiya.ai/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.