या अॅपच्या सहाय्यानं पैसे न देता बुक करा रेल्वे तिकिट! अत्यंत सोपी आहे पद्धत, करावं लागेल फक्त एवढं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:51 PM2022-03-31T20:51:58+5:302022-03-31T20:54:40+5:30
पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर...
नवी दिल्ली - देशभरातील कोरोना रुग्ण संख्या आता मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. यामुळे लोकांनी पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली आहे. जर आपण रेल्वेने प्रवास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म पेटीएमने नुकतीच एक नवीन सेवा सुरू केली आहे. याद्वारे आपण तत्काळ पैसे न देताही ट्रेनचे तिकीट बुक करू शकता.
पैसे न देता बुक करा रेल्वे तिकीट -
पैसे न देता रेल्वेचे तिकीट कसे बुक करता येते, असा विचार आपण करत असाल तर, पेटीएमने यासंदर्भात नवीन सेवा सुरू केली आहे. पेटीएमने, पेटीएम पोस्टपेड सोबतच आयआरसीटीसी तिकीट सेवेवर 'बुक नाऊ, पे लेटर' (Book Now, Pay Later) ही सेवाही सुरू केली आहे. या अंतर्गत आपण आधी तिकीट बुक करू शकता आणि नंतर पैसे भरू शकता.
या सेवेंतर्गत आपल्याला तिकीट बुक करताना पैसे द्यावे लागत नसले तरी, नंतर आपल्याला पैसे द्यावे लागतील. Paytm Postpaid 30 दिवसांसाठी आपल्या ग्राहकांना 60 हजार रुपयांपर्यंतचे क्रेडिटही देते. यावर आपल्याला कसल्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही. या क्रेडिटमधून झालेल्या सर्व खर्चाचे बील आपल्याला महिन्याच्या शेवटी दिले जाईल. आपण हे बील ईएमआय पद्धतीनेही भरू शकता.