WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवायची आहे? जाणून घ्या पद्धत  

By सिद्धेश जाधव | Published: September 4, 2021 07:23 PM2021-09-04T19:23:24+5:302021-09-04T19:23:33+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं लास्ट सीन लपवणे आणि ब्लूट टिक बंद करणे खूप सोप्पं आहे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. 

Know how to hide last seen and blue ticks on whatsapp   | WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवायची आहे? जाणून घ्या पद्धत  

WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवायची आहे? जाणून घ्या पद्धत  

googlenewsNext

WhatsApp ने आपल्या युजर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेतली आहे. यासाठी अ‍ॅपच्या सेटिंगमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सेटिंग बदलून तुम्ही तुमचे प्रोफाईल पिक्चर कोण बघू शकते किंवा तुम्हाला मेसेज कोण करू शकतं हे देखील ठरवू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही या मेसेजिंग अ‍ॅपमधील लास्ट सीन आणि ब्लूट टिक देखील लपवू शकता.  

Last Seen या फिचरमुळे तुम्ही कधी WhatsApp ओपन केले होते किंवा वापरले होते ते इतरांना दिसते. तसेच तुम्हाला पाठवलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज तुम्ही वाचला कि नाही हे मेसेजवरील दोन ब्लू टिक मधून समजते. कधीकधी हे फीचर्सच डोईजड होतात आणि लोक तुम्हाला त्रास देऊ लागतात. या पासून वाचण्याचा उपाय आम्ही पुढे सांगितला आहे. तुम्ही प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन तुमचे लास्ट सीन आणि ब्लू टिक बंद करू शकता.  

WhatsApp प्रायव्हसी सेटिंग बदलण्यासाठी  

Last Seen लपवण्यासाठी :

  • Last Seen लपवण्यासाठी अ‍ॅप ओपन करा आणि वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा. 

इथे सर्वात खाली असलेल्या Setting ऑप्शनवर जा. त्यानंतर Account वर क्लिक करा. 

  • त्यानंतर प्रायव्हसीवर जा. तिथे सर्वात पहिला पर्याय Last Seen चा दिसेल. 
  • त्यावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर 3 ऑप्शन येतील. जर तुम्हाला फक्त तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना लास्ट सीन दाखवायचे असेल तर My Contacts ची निवड करा. 
  • आणि जर कोणलाही तुमचे लास्ट सीन दाखवायचे नसेल तर Nobody ची निवड करा. Everybody हा पर्याय सर्वांना लास्ट सीन दाखवण्यासाठी आहे, जो सुरुवातीपासून ऑन असतो.  
  • आता कोणालाही तुम्ही कधी WhatsApp वापरले होते ते दिसणार नाही.  

ब्लू टिक लपवण्यासाठी : 

  • ब्लू टिक लपवण्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे Setting मध्ये जा. त्यांनतर Account मध्ये जाऊन Privacy वर क्लिक करा. 
  • आता Last Seen च्या खाली Read Receipts चा ऑप्शन दिसेल. तो डिसेबल करा. 
  • आता तुमच्या मेसेजवर ब्लू टिक येणे बंद होईल.  

महत्वाची सूचना:

  • तुम्ही लास्ट सीन बंद केले कि तुम्हाला इतरांचे लास्ट सीन देखील बघता येणार नाही. तसेच तुम्ही ब्लु टिक बंद केल्यास तुम्हालाही इतरांनी तुमचा मेसेज वाचला आहे कि नाही ते समजणार नाही.
  • तुम्ही वरील स्टेप फॉलो करून केलेले बदल पुर्वव्रत देखील करू शकता किंवा इतर पर्यायांची निवड करू शकता.  

Web Title: Know how to hide last seen and blue ticks on whatsapp  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.