देसी ट्विटर 'Koo App' बंद होणार, कंपनीच्या संस्थापकांनी लिंक्डइनवरुन दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:18 PM2024-07-03T14:18:29+5:302024-07-03T14:22:42+5:30
Koo App : २०२० मध्ये सुरू झालेलं कू अॅप बंद होणार आहे, याबाबत संस्थापकांनी लिंक्डइनवर माहिती दिली आहे.
Koo App : २०२० मध्ये मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरला टक्कर देण्यासाठी नवीन देसी Koo App सुरु करण्यात आले होते. चार वर्षांपूर्वी आलेले कू ॲप नेटकऱ्यांना आवडलेलं नाही, त्यामुळेच गेल्या चार वर्षांपासून कंपनी बाजारात टिकून राहण्यासाठी धडपडत होती, मात्र आता अखेर कंपनीने कू ॲप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
खूप दिवसांपासून Koo ॲपच्या अधिग्रहणाची चर्चा होती पण याचे अधिगृहन झाले नाही. कू कंपनीचे सह-संस्थापक मयंक बिदावतका यांनी अलीकडेच LinkedIn वर एका पोस्टमध्ये माहिती दिली, या पोस्टमध्ये ते म्हणाले की, आम्ही अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या, समूह आणि मीडिया हाऊसशी चर्चा केली परंतु आम्हाला हवे तसे परिणाम मिळाले नाहीत, असं म्हटले आहे.
२०२० मध्ये लाँच केलेले Koo ॲप ही पहिली भारतीय मायक्रोब्लॉगिंग साइट होती जी वापरकर्त्यांसाठी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध होती. आत्तापर्यंत हे ॲप ६० मिलियन म्हणजेच ६ कोटींहून अधिक वेळा डाउनलोड झाले आहे.
कर्मचाऱ्यांना केलं कमी केलं
कू अॅप बंद होण्यापूर्वी कंपनीच्या सह-संस्थापकांनी ॲपबद्दल काही महत्त्वाची माहिती देखील शेअर केली आहे. Koo ॲपवर दर महिन्याला १० मिलियन सक्रिय वापरकर्ते, २.१ मिलियन रोजचे सक्रिय वापरकर्ते, दरमहा १० मिलियन पोस्ट आणि ९ हजारांहून अधिक व्हीआयपी खाती होती.
गेल्या काही दिवसापासून कू ॲप बंद होणार अशा चर्चा सुरू होत्या. एप्रिल २०२३ मध्ये कंपनीने आपल्या सुमारे एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले.
Koo ने देखील Accel आणि Tiger Global सारख्या गुंतवणूकदारांकडून ६० मिलियन डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला होता, पण तरीही कंपनीने चांगली कामगिरी केली नाही. Twitter ने जसं काम केलं तसं काम कू अॅप करु शकली नाही.