'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 01:23 PM2021-02-10T13:23:42+5:302021-02-10T13:34:09+5:30

Who is behind the Koo App? How did Koo rise to prominence? : सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या Koo अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे.

koo twitter alternative made in india what is koo and how to download in android and ios know features | 'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

'Twitter' ला टक्कर देणार स्वदेशी अ‍ॅप 'Koo', 10 लाखांहून अधिक भारतीयांनी केलं डाऊनलोड, जाणून घ्या खासियत...

Next
ठळक मुद्देयुजर्स कू अ‍ॅपद्वारे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर  करू शकतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली होती. त्यानंतर बऱ्याच भारतीय डेव्हलपर्सनी अनेक मेक इन इंडिया  (made in india) अ‍ॅप्स लॉन्च केले आहेत. असेच एक भारतीय अ‍ॅप 'Koo' आहे. जे Twitter ला भारतीय पर्याय आहे. अनेक भारतीय मंत्र्यांनी व सेलिब्रिटींनी हे भारतीय अ‍ॅप डाऊनलोड करुन साइन अप केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासारख्या महत्त्वपूर्ण व्यक्तीही Koo क्लबमध्ये आल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया Koo बद्दलची महत्वाची माहिती... (Explained: Who is behind the Koo App, the Indian alternative to Twitter)

Koo हा Twitter ला भारतीय पर्याय आहे. या भारतीय मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटची निर्मिती मार्च 2020 मध्ये अप्रम्या राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) आणि मयंक बिदावत्क (Mayank Bidawatka) यांनी केली. हे मुख्यत्वे ट्विटर सारखे मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याचा उपयोग वेगवेगळ्या विषयांवर आपले मत देण्यासाठी केला जाऊ शकतो. (The Indian government is backing a homegrown alternative because Twitter won’t bend to its will)

11 भाषेत आहे, हे अ‍ॅप...
सरकारद्वारे ऑगस्ट 2020 मध्ये देण्यात आलेल्या AatmaNirbhar App Innovation Challenge अंतर्गत या अ‍ॅपला तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप हिंदी, तेलगू, कन्नड, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी भाषांना सपोर्ट करते. युजर्स कू अ‍ॅपद्वारे फोटो, ऑडिओ, व्हिडिओ आणि कंटेंट शेअर  करू शकतात. ट्विटरप्रमाणेच कू देखील आपल्या युजर्सला डायरेक्ट मेसेजद्वारे चॅट करण्याची परवानगी देते. इतकेच नाही तर युजर्स या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइटवर कंटेंट शेअर करू शकतात.

कसे करावे डाऊनलोड Koo? 
जर तुम्हीही या मेड इन इंडिया अ‍ॅपचा वापर करायचा असले तर तुम्ही हे कू (koo) अ‍ॅप सहज डाऊनलोड करू शकता. हे दोन्ही आयफोन आणि अँड्राईड डिव्हाइसवर डाऊनलोड केले जाऊ शकते. अँड्राईड युजर अ‍ॅपला गुगल स्टोअर आणि आयओएस (iOS) युजर अॅपल अ‍ॅप स्टोअरमधून डाऊनलोड करू शकतात. गुगल प्ले स्टोअरवर याचे सरासरी रेटिंग 4.7 स्टार आहे. तर iOS अ‍ॅपवर याचे रेटिंग 4.1 आहे. अँड्राईडवर या अ‍ॅपला आतापर्यंत 49,400 हून अधिक रिव्यू मिळाले आहेत. तसेच, आतापर्यंत हे अ‍ॅप दहा लाखाहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. (As Twitter seeks talks, Ministers move to Indian-made app Koo)

Web Title: koo twitter alternative made in india what is koo and how to download in android and ios know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.