पुन्हा घुमणार जय पबजीचा नारा! पुढील महिन्यात येतोय PUBG: New State; भारतात देखील होणार उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Published: October 22, 2021 03:17 PM2021-10-22T15:17:02+5:302021-10-22T15:17:13+5:30
PUBG Mobile New State India: गेम डेव्हलपर Krafton ने येत्या 11 नोव्हेंबरला या गेमचा नवीन व्हर्जन PUBG: NEW STATE लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
भारतात PUBG Mobile खूप लोकप्रिय मोबाईल गेम होता. त्यानंतर सरकारने या गेमवर बंदी घातली होती. बंदी नंतर या गेमने देशात पुनरागमन केले परंतु या गेमचे नाव Battlegrounds Mobile India म्हणजे BGMI ठेवण्यात आले आहे. आता पुन्हा एकदा या चाहत्यांना जय पबजी असा नारा देण्याची संधी मिळणार आहे. गेम डेव्हलपर Krafton ने येत्या 11 नोव्हेंबरला या गेमचा नवीन व्हर्जन PUBG: NEW STATE लाँच केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून क्राफ्टनने PUBG: New State च्या लाँचची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार नवीन पबजी मोबाईल येत्या 11 नोव्हेंबरला जगभरात लाँच केला जाईल. विशेष म्हणजे पबजी: न्यू स्टेट 200 पेक्षा जास्त देश आणि 17 विविध भाषांमध्ये उपलब्ध होईल. तसेच iOS iPhone आणि Android Smartphone अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर हा गेम इन्स्टॉल करता येईल.
PUBG: New State
पबजी: न्यू स्टेट हा गेम साल 2050 मधील जग या थीमवर आधारित असेल. त्यामुळे यात नवीन गेम मॅप, हत्यार, गाड्या व लोकेशन्स देण्यात येतील. या गेममधे प्लेयर्स ड्रोनचा वापरू करू शकतील आणि इलेक्ट्रिक कार्स देखील गेम मध्ये मिळतील. ड्रोन स्ट्राईकचा पर्याय देखील युजर्सना देण्यात येईल. विशेष म्हणजे PUBG: New State मधील Recriut System मध्ये एकदा मेल्यानंतर एखादा टीम मेम्बर गेम बघत असेल तर त्याला पुन्हा रिव्हाइव्ह करण्याची संधी मिळेल. तसेच प्रतिस्पर्धी टीम देखील युजर्सना त्याच्या टीममध्ये इन्व्हाईट करू शकते.
इथे करा PUBG: New State गेमचे रजिस्ट्रेशन
PUBG: New State मोबाईल गेम Apple App Store तसेच Google Play Store वर रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध आहे. भारतात हा गेम प्री-रजिस्ट्रेशन करणाऱ्या सर्व प्लेयर्सना Free Vehicle Skin लाइफटाईम वॅलिडिटीसह देण्यात येईल.
- Android युजर्स PUBG: New State गेम प्री-रजिस्टर करण्यासाठी (इथे क्लिक करा)
- Apple iOS युजर्स PUBG: New State गेम को प्री-रजिस्टर करण्यासाठी (इथे क्लिक करा)