सावधान! लॅपटॉप साफ करताना 90% लोक करतात 'ही' चूक; करंट लागण्याचा मोठा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 11:03 AM2023-08-26T11:03:40+5:302023-08-26T11:10:17+5:30

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. लॅपटॉपची साफसफाईची करताना युजर्सनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

laptop cleaning kit mistake you should avoid never do this else get electric shock current screen keys damage | सावधान! लॅपटॉप साफ करताना 90% लोक करतात 'ही' चूक; करंट लागण्याचा मोठा धोका

सावधान! लॅपटॉप साफ करताना 90% लोक करतात 'ही' चूक; करंट लागण्याचा मोठा धोका

googlenewsNext

लॅपटॉप आता जवळपास सर्वच कार्यालयात जाणारे लोक वापरतात. शाळेची कामंही सहज व्हायला हवीत, त्यामुळे मुलांनाही लॅपटॉप हवा. इलेक्ट्रॉनिक किंवा कोणतंही गॅझेट त्याची योग्य काळजी घेतली तरच दीर्घकाळ टिकतं हे खरं आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंची स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. लॅपटॉपची साफसफाईची करताना युजर्सनी काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे.

साफसफाई सुरू करण्यापूर्वी, तुमचा लॅपटॉप बंद करा आणि कोणत्याही पॉवर सोर्सपासून अनप्लग करा. यामुळे विजेचा शॉक आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान होण्याचा धोका टाळता येईल. पॉवर प्लग सुरू ठेवल्यानंतर ओल्या कपड्याने साफसफाई सुरू केली तर करंट लागण्याचा धोका असतो. लॅपटॉपची स्वच्छता करताना याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. 

स्वच्छतेसाठी जे काही आवश्यक असेल ते तयार ठेवा. लॅपटॉपच्या बाहेरील भाग स्वच्छ करण्यासाठी मायक्रोफायबर कापड वापरा. धूळ, बोटांचे ठसे आणि डाग काढून टाकण्यासाठी कोरड्या मायक्रोफायबर कापडाचा वापर करून लॅपटॉपच्या बाहेरील पृष्ठभाग हळुवारपणे पुसून काढा. जर तुम्ही त्यावर जोर लावला तर तुमच्या स्क्रीनवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि ती क्रॅक देखील होऊ शकते.

कीज आणि टचपॅडमधील कचरा आणि धूळ काढण्यासाठी मऊ ब्रश किंवा कंप्रेस एयर वापरा. बोटांचे ठसे, धूळ आणि डाग काढून टाकण्यासाठी स्वच्छ मायक्रोफायबर कापडाचा वापर करून स्क्रीन हळूवारपणे पुसणे योग्य आहे. लॅपटॉप स्वच्छ करण्यासाठी घरगुती क्लिनिंग एजंट्स वापरणं टाळा, कारण ते लॅपटॉपच्या पृष्ठभागाला हानी पोहोचवू शकतात.

लॅपटॉपच्या व्हेंट्स आणि पोर्टमधून धूळ काढण्यासाठी कॉम्प्रेस्ड एअर वापरा. डिव्‍हाइसमध्‍ये धूळ जाण्‍यापासून रोखण्‍यासाठी लॅपटॉप वेगळ्या अँगलमध्ये धरूनच साफ करा. लक्षात ठेवा लॅपटॉपच्या चार्जिंग पोर्टवर कोणतीही तीक्ष्ण वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे पोर्टच्या आत काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं.

कीबोर्डच्या स्वच्छतेकडे लक्ष देणं आवश्यक 

लॅपटॉप टिल्ट करा आणि हलके टॅप करा जेणेकरून कचरा बाहेर येईल. उर्वरित कचरा बाहेर काढण्यासाठी तुम्ही कॉम्प्रेस्ड एअर देखील वापरू शकता. कीबोर्ड साफ करण्यासाठी कोणतेही द्रव वापरू नका, कारण ते कीजच्या मध्ये जाऊन नुकसान होऊ शकतं. धूळ जमा झाल्यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची तुम्हाला शंका असल्यास, एखाद्या प्रोफेशनलकडून त्याची तपासणी करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: laptop cleaning kit mistake you should avoid never do this else get electric shock current screen keys damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.