आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 03:19 PM2018-02-15T15:19:21+5:302018-02-15T15:19:28+5:30

आयबॉल कंपनीने विंडोज १० या प्रणालीवर चालणारा काँपबुक प्रेमिओ व्ही २.० हा लॅपटॉप भारतीय युजर्ससाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

Laptop running on iBall Windows 10 | आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप

आयबॉलचा विंडोज १० प्रणालीवर चालणारा लॅपटॉप

Next

आयबॉल कंपनीने विंडोज १० या प्रणालीवर चालणारा काँपबुक प्रेमिओ व्ही २.० हा लॅपटॉप भारतीय युजर्ससाठी बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.

विंडोज १० प्रणालीसोबत प्रॉडक्टीव्हिटीसाठी सादर करण्यात आलेले टुल्स हे विद्यार्थ्यांसह विविध प्रोफेशनल्ससाठी उपयुक्त असतात. या पार्श्‍वभूमिवर, याच वर्गाला समोर ठेवून आयबॉल काँपबुक प्रेमिओ व्ही २.० हा लॅपटॉप बाजारपेठेत उतारण्यात आला आहे. यात १४ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१३६६ बाय ७६८ पिक्सल्स) डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मल्टी-टच या सुविधेसह  टचपॅड हे फिचर प्रदान करण्यात आले आहे. यात इंटेलचा क्वॉड-कोअर अपोलो लेक पेंटीयम एन४२०० हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा यात दिलेली आहे. तर यात १ टेराबाईटपर्यंतचे एसएसडी या प्रकारातील स्टोअरेज वाढविता येणार आहे.

आयबॉल काँपबक प्रेमिओ व्ही २.० या मॉडेलमध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, मिनी एचडीएमआय, युएसबी ३.० आदी कनेक्टिव्हीटीचे पर्याय आहेत. तर यात ०.३ मेगापिक्सल्स क्षमतेचा वेब कॅमेरादेखील प्रदान करण्यात आला आहे. यात इंटिलेजियंट पॉवर सेव्हींग मोडसह ३८ वॅट क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर प्रदीर्घ काळाचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ग्राहकांना हे लॅपटॉप २१,९९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.
 

Web Title: Laptop running on iBall Windows 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.