लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:36 PM2023-10-25T12:36:58+5:302023-10-25T12:37:23+5:30

फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे.

late but not least! India in top five in 5G connectivity; You may not even have heard the name of the first country Puerto Rico | लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल...

लेट हाय पण थेट हाय! 5G मध्ये भारत जगात पाचवा; पहिल्या देशाचे नाव तर ऐकलेही नसेल...

कोरोनानंतर काही काळातच अमेरिका, चीन, युरोपमधील देशांनी ५जी सुरु केले होते, तेव्हा कुठे भारत त्याची तयारी करत होता. परंतू, उशिराने एन्ट्री झाली फार कमी काळात भारताने एवढी मोठी झेप घेतलीय की जगातील पहिल्या पाचात जाऊन बसला आहे.

5G ची सर्वाधिक उपलब्धता असलेल्या देशात भारताचा पहिल्या पाचात नंबर लागत आहे. एका वर्षातच भारताने ही कामगिरी केली आहे. यामुळे भलेभले विकसित देश यामध्ये मागे पडले आहेत. भारतात सध्या दोनच कंपन्या फाईव्ह जी सेवा देतात. १ ऑक्टोबर २०२२ ला पहिल्यांदा एअरटेलने फाईव्ह जी सेवा सुरु केली होती. त्यानंतर काही दिवसांनी रिलायन्स जिओने सुरु केली. परंतू, व्होडाफोन आयडिया आणि बीएसएनएल या कंपन्यांनी अद्याप फाईव्ह जी कडे ढुंकूनही पाहिलेले नाहीय. 

एअरटेल आणि जिओ या कंपन्यांची फाईव्ह जी सेवा अद्याप मेट्रो आणि मध्यम शहरांमध्येच पोहोचल्या आहेत. तालुकापातळीवरील छोटी शहरे, गावे अद्याप यापासून लांबच आहेत. तरी देखील भारताने पहिल्या पाचात स्थान मिळविले आहे. जेव्हा आणखी काही महिन्यांत सर्व देश व्यापला जाईल तेव्हा भारताचा पहिला किंवा दुसरा क्रमांक असेल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सच्या एक्स हँडलवरून याबाबत एक ट्विट करण्यात आले आहे. यानुसार भारताने सर्वाधिक 5G उपलब्धता असलेल्या टॉप-5 देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 29.9 टक्के 5G उपलब्धतेसह भारत या यादीत 5 व्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर सिंगापूर 30 टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका असून 31.1 टक्के लोकांना 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली आहे. दक्षिण कोरिया 42.9 टक्के सह दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तु रिको पहिल्या स्थानावर आहे, त्यांच्या देशातील 48.4 टक्के लोकांकडे 5G कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. या यादीत चीनचा समावेश करण्यात आलेला नाही.


 

Web Title: late but not least! India in top five in 5G connectivity; You may not even have heard the name of the first country Puerto Rico

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.