आज मध्यरात्री Samsung Galaxy S10 लाँच करणार; पहा काय असेल खास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 12:44 PM2019-02-20T12:44:27+5:302019-02-20T12:44:50+5:30

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Samsung ने आज मध्यरात्रीनंतर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये Unpacked 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Launching Samsung Galaxy S10 today midnight; See what's special | आज मध्यरात्री Samsung Galaxy S10 लाँच करणार; पहा काय असेल खास

आज मध्यरात्री Samsung Galaxy S10 लाँच करणार; पहा काय असेल खास

Next

मुंबई : दक्षिण कोरियाची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Samsung ने आज मध्यरात्रीनंतर सॅन फ्रान्सिस्कोमध्ये Unpacked 2019 या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी सॅमसंग Galaxy S10 ही प्रिमिअम स्मार्टफोन सिरिज लाँच करणार आहे. यामध्ये Galaxy S10, S10+ आणि S10e असणार आहेत. याशिवाय पहिला फोल्डेबल फोन Galaxy Fold हा लाँच केला जाण्याची शक्यता आहे. 

भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12.30 वाजता हा कार्यक्रम सुरु होणार आहे. या इव्हेंटमध्ये Galaxy Buds आणि Galaxy Watch Active smartwatch ही दाखविले जाण्याची शक्यता आहे. 


Galaxy S10e आणि S10+ मध्ये अनुक्रमे 6.1 इंच आणि 6.4 इंचाचा क्युएचडी प्लस इन्फिनिटी- ओ सुपर अमोल्ड कर्व्हड डिस्प्ले असणार आहे. त्यासोबत गोरिल्ला ग्लास 6 ची सुरक्षा दिली जाणार आहे. दोन्ही फोनमध्ये वरती उजव्या बाजुला सेल्फी कॅमेरासाठी होल असणार आहे. तर एस10 मध्ये सर्क्युलर कटआऊटबरोबर 10 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात येणार आहे. S10+ मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरासाठी वाईड कटआऊट असणार आहे. पहिला सेन्सर 10 मेगापिक्सल आणि दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा असणार आहे. 
दोन्ही फोनमधील बॅकपॅनेल प्रीज्म व्हाइट, प्रीज्म ग्रीन आणि प्रीज्म ब्लैक ग्लासचे असणार आहे.


या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. यामध्ये LED फ्लॅशसोबत हार्ट रेट सेन्सरही असणार आहे. यामध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. Galaxy S10 मध्ये 6 आणि 8 जीबी रॅमसर 128/512 जीबी स्टोरेज असणार आहे. तर  S10+ मध्ये 12 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेज असणार आहे. 

फोल्डेबल फोन 
यंदाचे आकर्षण म्हणजे फोल्डेबल फोन Samsung Galaxy F असणार आहे. या फोनमध्ये दोन स्क्रीन असणार असून एक आतल्या बाजुला व दुसरी बाहेरच्या बाजुला असणार आहे. स्क्रीनचा कव्हर डिस्प्ले 4.58 इंचाचा देण्यात येणार आहे. ज्याच्या रेशो 21:9 आणि रिझोल्यूशन 840X1960 असण्याची शक्यता आहे. तसेच प्रायमरी डिस्प्ले 7.3 इंचाचा असण्याची शक्यता आहे. 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असणार आहे. मेमरी कार्डच्या वापराने 1024GB स्टोरेज वाढविता येणार आहे. 

Web Title: Launching Samsung Galaxy S10 today midnight; See what's special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.