लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

By शेखर पाटील | Published: July 25, 2017 11:55 AM2017-07-25T11:55:20+5:302017-07-25T16:35:46+5:30

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल.

Lava A93: Learn all the features | लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

लाव्हा ए ९३: जाणून घ्या सर्व फिचर्स

Next

लाव्हा कंपनीने भारतात ए ९३ हा किफायतशीर दरातला स्मार्टफोन लाँच केला असून याचे मूल्य ७,९९९ रूपये इतके असेल.
लाव्हा ए ९३ हे मॉडेल गोल्ड आणि ग्रे या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायात ग्राहकांना सादर करण्यात आल्याचे कंपनीच्या वेबसाईटवरील लिस्टींगवरून (Hyperlink: http://www.lavamobiles.com/smartphones/a93 ) स्पष्ट झाले आहे. फिचर्सचा विचार करता लाव्हा ए ९३ या मॉडेलमध्ये मिड-रेंजमधील स्मार्टफोनमध्ये असणारे बहुतांश फिचर्स आहेत. यात १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा आयपीएस प्रकारातील ५.५ इंच आकारमानाचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. १.२ गेगाहर्टझ् क्वाड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ते ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. ऑटो-फोकस, एलईडी फ्लॅश, एचडीआर आणि फोटो टायमर या सुविधांसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.
लाव्हा ए ९३ या स्मार्टफोनमध्ये ‘पॉवर सेव्हर मोड’सह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ड्युअल सीमकार्ड व फोर जी नेटवर्क सपोर्टची सुविधा असणार्‍या या मॉडेलमध्ये वाय-फाय, ब्ल्यु-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडिओ, युएसबी २.० आदी फिचर्स असतील. याशिवाय यात व्हिडीओ पी-आय-पी, स्मार्ट म्युझिक, स्मार्ट जेस्चर, जी-सेन्सर, अँबियंट लाईट सेन्सर आदी अतिरिक्त सुविधा देण्यात आल्या आहेत. मूल्याचा विचार करता लाव्हा ए ९३ या मॉडेलला शाओमी रेडमी ४, शाओमी रेडमी ४ ए, मोटो सी प्लस आदी स्मार्टफोन्सची तगडी स्पर्धा असेल.

Web Title: Lava A93: Learn all the features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.