स्वदेशी कंपनी लावाने लाँच केला Lava Benco V80; लो बजेटमध्ये देईल का Realme-Xiaomi ला टक्कर?
By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2021 12:30 PM2021-06-24T12:30:41+5:302021-06-24T12:32:14+5:30
Lava Benco V80 launch: Lava ने Benco Mobile शी भागेदारी करून Lava Benco V80 स्मार्टफोन Unisoc SC9863 क्वाड कोर चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे.
स्वदेशी स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने Benco Mobile शी भागेदारी करून Lava Benco V80 स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतात कधी लाँच केला जाईल, याची कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. या स्मार्टफोनमध्ये क्वाड कोर Unisoc चिपसेटसह 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Lava Benco V80 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर
Lava Benco V80 मध्ये 6.517 इंचाचा IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन HD+ 720 x 1600 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. या स्मार्टफोनमध्ये 89.5 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आहे. फोनच्या मागे एक 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
लावा आणि बेंकोच्या या फोनमध्ये Unisoc SC9863 क्वाड कोर चिपसेट सोबत 4GB रॅम देण्यात आला आहे. Lava Benco V80 Android 11 ओएसवर चालतो. या फोनमधील 64GB इंटरनल स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या फोनमध्ये सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 10W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
Lava Benco V80 ची किंमत
Lava Benco V80 स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजची किंमत थायलंडमध्ये 2890 Baht (अंदाजे 6,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन Cyan Blue आणि Greenish Silver कलर व्हेरिएंट्समध्ये सादर केला गेला आहे.