चिनी कंपन्यांना धूळ चारण्यासाठी स्वदेशी कंपनीची दणकट तयारी; 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2022 03:01 PM2022-06-18T15:01:01+5:302022-06-18T15:02:23+5:30
Lava Blaze बजेट सेगमेंटमध्ये धुमाकूळ घालू शकतो.
काही दिवसांपूर्वी स्वदेशी कंपनी Lava बाबत बातमी आली होती की कंपनी बजेट सेगमेंटमध्ये ग्लास बॅक असलेला स्मार्टफोन सादर करणार आहे. आता बातमी आली आहे की हा 4जी स्मार्टफोन Lava Blaze नावानं बाजारात येईल. फोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे. टेक वेबसाईट माय स्मार्ट प्राईसनं आगामी लावा फोनचे काही फोटो देखील शेयर केले आहेत, त्यातून फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे.
Lava Blaze ची डिजाइन
लीक इमेजनुसार हा फोन लाल रंगात सादर परंतु ड्युअल कॅमेरा मॉड्यूल काळ्या रंगात दिसू शकतो. फोन 2.5डी कर्व्ड ग्लाससह सादर केला जाऊ शकतो. मागे एक चौकोनी कॅमेरा मॉड्यूल दोन कॅमेरा सेन्सरसह मिळेल. परंतु एका बातमीनुसार या फोनमध्ये चार कॅमेरे असू शकतात. फोनच्या उजव्या पॅनलवर हार्डवेयर बटन्स मिळतील.
Lava Blaze चे स्पेसिफिकेशन
रिपोर्ट्नुसार Lava Blaze मध्ये 6.78 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले मिळेल. पंच होल कटआऊटसह येणारा हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 2460 × 1080 पिक्सल रिजॉल्यूशनला सपोर्ट करेल. पावर बॅकअपसाठी 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.
फोनमध्ये 2.4GHz क्लॉक स्पीड असलेला MediaTek प्रोसेसर दिला जाऊ शकतो. तसेच ग्राफिक्ससाठी माली-G57 MC2 GPU असण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 8GB रॅम दिला जाऊ शकतो, सोबत 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात येईल, जी मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित असू शकतो.
Lava Blaze मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64MP चा मुख्य सेन्सर, 5MP चा अल्ट्रा वाईड, 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा असेल. फोनमध्ये ड्युअल 4जी, ड्युअल-बँड वायफाय आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल.