ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

By सिद्धेश जाधव | Published: July 23, 2021 12:32 PM2021-07-23T12:32:24+5:302021-07-23T12:33:10+5:30

Lava 5G Smartphone: भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava आपला पहिला 5G स्मार्टफोन यावर्षी भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे.  

lava to launch first 5g smartphone at diwali price 17000 with smartwatch  | ही स्वदेशी घेऊन येणार आपला पहिला 5G स्मार्टफोन; दिवाळीत सादर होऊ शकतो स्वस्त 5G फोन  

हा फोटो Lava Z2s चा आहे.

googlenewsNext

LAVA कंपनी आपल्या स्वस्त स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कालच कंपनीने आपला नवीन बजेट 4G स्मार्टफोन Lava Z2s भारतात लाँच केला आहे. या लावा स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 7,099 रुपयांमध्ये ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध होईल. परंतु आता कंपनी आपली मार्ग बदलणार आहे, Lava Mobile कंपनी 5G सेगमेंटमध्ये पाऊल टाकणार आहे. कंपनी लवकरच Lava 5G Phone लाँच करणार आहे, अशी बातमी समोर आली आहे.  (Lava will launch 5G smartphone in India at RS 17000)

Lava 5G Smartphone

टेक वेबसाइट गिजबोटने लावाच्या या पहिल्या 5जी फोनची माहिती दिली आहे. या वेबसाइटने लावाचे प्रोडक्ट हेड तेजिंद्र सिंह यांची मुलखात प्रकाशित केली आहे. या मुलाखतीतून लावा मोबाईल्सचे नियोजन आणि रणनीती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, कंपनी भारतात आपला पहिला 5जी फोन आणण्याची तयारी करत आहे, हा 5G Lava Mobile दिवाळीच्या निमित्ताने भारतात लाँच केला जाईल.  

लावा प्रोडक्ट हेड तेजिन्द्र सिंह यांनी सांगितले आहे कि, या Lava 5G SmartPhone स्पेसिफिकेशन्स लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हान्स असतील. तसेच या फोनसाठी टेलीकॉम कंपन्यांशी भागेदारी करून बंडल ऑफर देखील दिली जाऊ शकते. या फोनची किंमत 17,000 ते 20,000 रुपयांच्या आसपास असेल.   

Lava Smart Watch  

2021 च्या उत्तरार्धात लावा फक्त 5G सेगमेंटमध्ये येणार नसून कंपनी स्मार्टवॉच देखील सादर करणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने कंपनी आपला पहिला Smart Watch लाँच करणार आहे. Lava कंपनी आपल्या नवीन प्रोडक्ट स्मार्टवॉचवर काम करत असल्याची माहिती कंपनीच्या प्रॉडक्ट हेड सिंह यांनी मुलाखतीती दिली आहे.  

Web Title: lava to launch first 5g smartphone at diwali price 17000 with smartwatch 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.