१ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 03:00 PM2021-06-21T15:00:39+5:302021-06-21T15:02:53+5:30

Lava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री. कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन.

Lava Probuds TWS Earbuds Launched With an Introductory Rs 1 Price Tag Sale Date Features Actual Price amazon flipkart | १ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

१ रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स; या दिवशी घेता येणार 'Lava' च्या इंट्रोडक्टरी ऑफरचा लाभ

Next
ठळक मुद्देLava कंपनीची ट्रू वायरलेस इयरफोन सेगमेंटमध्ये एन्ट्री.कंपनी लाँच करणार आपला पहिला ट्रू वायरलेस इयरफोन.

Lava True Wireless Earbuds : 21 जून रोजी जगभरात वर्ल्ड म्युझीक डे (World Music Day) साजरा केला जातो. यादरम्यान, भारतीय मोबाईल कंपनी लावानं ट्रू वायरलेस सेगमेंटमध्ये एन्ट्री करत आपला पहिला प्रोडक्ट Lava Probuds लाँच केला आहे. एक खास बाब म्हणजे कंपनीनं हे इयरबड्स एका इंट्रोडक्टरी ऑफरसह लाँच केले आहेत. ऑफर अंतर्गत ग्राहकांना हे इयरबड्स Lava E-store, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून केवळ १ रूपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता ही ऑफर सुरू होणार असून स्टॉक संपेपर्यंत ती सुरू राहिल.

२५ तास चालणार बॅटरी
लावा प्रोबड्समध्ये 11.6mm अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर्स आि मीडियाटेक Airoha चिपसेट देण्यात आला आहे. साईजमध्ये हे इयरबड्स छोटे वाटत असले तरी Bass सोबत पॉवरफुल साऊंडचा अनुभव याद्वारे घेता येतो. यामध्ये  55mAh क्षमतेची बॅटरी (दोन्ही बड्समध्ये निरनिराळी) देण्यात आली आहे. याशिवाय केसमध्ये 500mAh क्षमतेची बॅटरी मिळते. सलग 25 तास म्युझिक ऐकता येऊ शकतं असा दावाही कंपनीनं केला आहे. 

Lava Probuds चा परफॉर्मन्स उत्तम असून यामध्ये प्रीमिअम डिझाईन, सुंदर ब्लॅक कलर आणि जबरदस्त मॅट फिनिश पाहायला मिळतं. ग्राहकांकडून फीडबॅक घेतलव्यानंतर आणि कानांवर ट्रायल घेतल्यानंतरच हे इयरबड्स तयार करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

ऑफरनंतर 'इतकी' असेल किंमत
लावाचे हे नवे इयरबड्स वेक अँड पेअर तंत्रज्ञानावर आधारित आहेत. चार्जिंग केस उघडल्यानंतर इयरबड्सला पॉवर मिळते आणि कनेक्ट होण्यासाठी ते तयार होतात. यामध्ये Bluetooth v5.0 कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक कंट्रोलचं फीचरही मिळतं. हे इयरबड्स IPX5 वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंट आहेत. या इयरबड्ससोबत वॉईस असिस्टंटचही फीचर मिळतं. या प्रोडक्टसह एका वर्षाची वॉरंटी देण्यात येत असून इट्रोडक्टरी ऑफर नंतर Lava Probud साठी 2,199 रूपये खर्च करावे लागतील.

Web Title: Lava Probuds TWS Earbuds Launched With an Introductory Rs 1 Price Tag Sale Date Features Actual Price amazon flipkart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.