बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ
By सिद्धेश जाधव | Updated: March 4, 2022 18:03 IST2022-03-04T18:02:34+5:302022-03-04T18:03:12+5:30
Lava X2 Phone: Lava X2 फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे.

बाजूला व्हा! 6,599 रुपयांमध्ये आला जबरदस्त स्वदेशी स्मार्टफोन, चिनी कंपन्यांच्या अडचणीत वाढ
LAVA नं आपला नवीन स्मार्टफोन लो बजेट सेगमेंट सादर केला आहे. हा फोन Lava X2 नावानं भारतात आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत फक्त 6,599 रुपये ठेवली आहे. या फोनमध्ये 2GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. हा मोबाईल 11 मार्चपासून शॉपिंग साईट अॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. चला जाणून घेऊया या स्वदेशी स्मार्टफोनची माहिती.
Lava X2 चे स्पेसिफिकेशन्स
लावा एक्स2 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हलक्या अँड्रॉइड अर्थात अँड्रॉइड 11 गो वर चालतो. ज्यात गुगल गो अॅप्सचं लाईट व्हर्जन मिळतं. हे अॅप्स कमी रॅम व स्टोरेजमध्ये देखील स्मूद चालतात. तसेच इंटरनेटचा वापर देखील खूप कमी केला जातो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक हीलियो चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.
या लावा फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि एक एआय लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. पावर बॅकअपसाठी यात 5,000एमएएचची बॅटरी आहे. जी 20 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते.
हे देखील वाचा:
- भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! कमी किंमतीत मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट
- Samsung बाजारपेठेत उडवणार खळबळ; 20 हजारांच्या बजेटमध्ये येतोय अॅडव्हान्स फीचर्स असलेला फोन
- टीव्हीच्या खरेदीवर ‘बिग बचत’! 6 हजारांमध्ये 40-इंचाचा Smart TV, उरले फक्त 3 दिवस