स्वदेशी कंपनी Lava ची कमाल! स्वस्तात लाँच केला 5000mAh बॅटरी असेलला Lava Z2s
By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 05:31 PM2021-07-22T17:31:56+5:302021-07-22T17:32:51+5:30
Lava Z2s India launch: Lava Z2s मध्ये 5000mAh ची बॅटरी, 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे.
Lava ने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन Lava Z2s लाँच केला आहे. या लावास्मार्टफोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 7,099 रुपयांमध्ये ऍमेझॉन आणि फ्लिपकार्टसह कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्सवर उपलब्ध होईल. ही किंमत मर्यादित कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे, या कालावधीनंतर ही किंमत वाढवली जाऊ शकते. नंतर या फोनची किंमत 7,299 रुपये होऊ शकते. (Lava Z2s launched in India at Rs 7299)
Lava Z2s चे स्पेसिफिकेशन्स
Lava Z2s मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ आयपीसी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटर ड्रॉप डिस्प्ले गोरिला ग्लास 3 प्रोटेक्शनसह येतो. या लावा फोनमध्ये MediaTek Helio Octa Core प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच कंपनीने यात 2GB रॅमसह 32GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. हा फोन Android 11 Go ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.
फोटोग्राफीसाठी Lava Z2s मध्ये दोन कॅमेरे मिळतात. या फोनमध्ये 8MP चा एक रियर कॅमेरा आहे. तसेच, व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.0, WiFi, ड्युअल 4G SIM आणि OTG सपोर्ट मिळतो. Striptd Blue कलर ऑप्शनमध्ये आला आहे. विशेष म्हणजे कंपनी Lava Z2s फोनवर 100 दिवसांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट वॉरंटी देखील देत आहे.