चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी

By सिद्धेश जाधव | Published: March 15, 2022 08:11 PM2022-03-15T20:11:37+5:302022-03-15T20:11:45+5:30

Lava Z3 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 3GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी आहे.

Lava Z3 Smartphone Launched With 5000mah Battery 8MP Camera Check Price And Specifications  | चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी

चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी

Next

Lava Z3 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा फोन Helio A20 चिपसेटवर चालतो. या एंट्री-लेव्हल फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 3GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. कंपनीनं यात वॉटरड्रॉप नॉच डिजाईन दिली आहे. हा फोन फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. Lava Z3 ची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन स्ट्राइप ब्लू आणि स्ट्राइप सियान अशा दोन रंगात Amazon India आणि Flipkart वरून विकत घेता येईल.  

Lava Z3 चे स्पेसिफिकेशन्स 

Lava Z3 मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सलचा एचडी+ रेजोल्यूशन आणि 20:9 अस्पेक्ट रेशियोला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्क्रीनला गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या एंट्री लेव्हल फोनमध्ये रियर-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.  

हा Android 11 OS वर चालतो आणि याला Helio A20 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येईल. Lava Z3 च्या मागच्या बाजूस एक ड्युअल-कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि एक सेकंडरी सेन्सर देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी यात 5,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

हे देखील वाचा:

Web Title: Lava Z3 Smartphone Launched With 5000mah Battery 8MP Camera Check Price And Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.