स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 1 इंचाच्या कॅमेरा सेन्सरसह Leica Leitz Phone 1 लाँच; जाणून घ्या या कॅमेरा सेंट्रिक फोनची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: June 18, 2021 03:50 PM2021-06-18T15:50:06+5:302021-06-18T15:51:05+5:30
Leica Phone: Leica Leitz Phone 1 फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे.
Leica ने आपला पहिला स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन Leitz Phone 1 नावाने बाजारात आला आहे. या फोनमधील 1 इंचाचा सेन्सर ही याची खासियत आहे. तसेचमी या फोनच्या मागे वर्तुळाकार कॅमेरा सेटअपच्या प्रोटेक्शनसाठी मॅग्नेटिक लेंस कॅप देण्यात आली आहे.
Leica Leitz Phone 1 ची किंमत
Leica ने Leitz Phone 1 जापानमध्ये लाँच केला आहे. या फोनची किंमत JPY 18,7920 (जवळपास 1,26,000 रुपये) आहे. हा फोन 1 जुलैपासून जपानमध्ये विकत घेता येईल.
Leica Leitz Phone 1 चे स्पेसिफिकेशन्स
Leica Leitz Phone 1 फोनमध्ये 6.6 इंचाचा ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120hz आहे. या अँड्रॉइड 11 असलेल्या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच या फोनमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मिळते, हि मेमरी 1 टीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डने वाढवता येते.
Leica कंपनी आपल्या कॅमेऱ्यांसाठी ओळखली जाते त्यामुळे Leitz Phone 1 फोनमधील कॅमेरा सेगमेंटवर कंपनीने जास्त भर दिला आहे. या फोनमध्ये कंपनीने 1 इंचाचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा 1 इंच सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 12.6 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे आणि यात अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.