लेनोव्होचे दोन फिटनेस ट्रॅकर दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 10:20 AM2018-04-25T10:20:38+5:302018-04-25T10:20:38+5:30

लेनोव्हो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी एचएक्स०३ कार्डीओ आणि एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा हे दोन फिटनेस ट्रॅकर सादर केले आहेत.

Lenovo fitness tracker on flipcart | लेनोव्होचे दोन फिटनेस ट्रॅकर दाखल

लेनोव्होचे दोन फिटनेस ट्रॅकर दाखल

Next

मुंबई-  लेनोव्हो एचएक्स०३ कार्डीओ आणि एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा या दोन्ही मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे १,९९९ आणि २,२९९ रूपये असून ग्राहकांना हे ट्रॅकर फक्त फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील पहिल्या ट्रॅकरची आधीच विक्री सुरू झाली असून दुसरे मॉडेल ३ मे पासून मिळणार आहे. दोन्ही मॉडेल वॉटरप्रूफ असल्यामुळे याला पाण्यातदेखील सहजपणे वापरता येणार आहे.

लेनोव्हो एचएक्स०३ कार्डीओ या मॉडेलमध्ये हार्ट रेट ट्रॅकर इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे. यात स्टॅटीक आणि डायनॅमिक या दोन्ही पध्दतीत हृदयाच्या ठोक्यांचे मापन करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये ब्ल्यु-टुथच्या मदतीने स्मार्टफोन कनेक्ट करता येतो. या स्मार्टफोनवरील विविध नोटिफिकेशन्स या ट्रॅकरवर पाहता येतात. यासाठी यामध्ये ०.९६ इंच आकारमानाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. निद्रेचे मापन करण्यासाठी यामध्ये स्लीप ट्रॅकर प्रणाली देण्यात आली आहे. याच्या जोडीला यामध्ये अलार्म क्लॉकची सुविधादेखील दिलेली आहे. यामध्ये ८५ मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल १० दिवसांपर्यंत चालत असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यासाठी अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी स्मार्टफोन अ‍ॅप्लीकेशन तयार करण्यात आले आहे.

लेनोव्हो एचएक्स०३एफ स्पेक्ट्रा या मॉडेलमध्ये १६० बाय ८० पिक्सल्स क्षमतेचा टिएफटी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्येही आधीच्या मॉडेल्सनुसारच सर्व फंक्शन्स देण्यात आले आहेत. याच्या जोडीला या ट्रॅकरसोबत बदलता येणारे विविध पट्टेदेखील दिलेले आहेत. तसेच यात आरोग्याच्या विविध बाबींवर अतिशय अचूकपणे लक्ष ठेवणारा इंटिलेजीयंट असिस्टंटदेखील प्रदान करण्यात आला आहे.

Web Title: Lenovo fitness tracker on flipcart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.