16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी

By सिद्धेश जाधव | Published: June 30, 2022 10:16 AM2022-06-30T10:16:36+5:302022-06-30T10:18:22+5:30

लेनोवोचा नवीन गेमिंग स्मार्टफोन लवकरच 16GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो.  

Lenovo legion halo gaming smartphone spotted on geekbench   | 16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी

16GB रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येतोय दमदार फोन; शाओमी-सॅमसंगची होणार सुट्टी

googlenewsNext

Lenovo सध्या स्मार्टफोन बाजारात जास्त सक्रिय नाही. कंपनीनं गेमिंग स्मार्टफोन्सवर लक्ष केंद्रित केलं आहे. आता गेमिंगच्या चाहत्यांसाठी कंपनी लवकरच नवीन गेमिंग स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा हँडसेट Lenovo Legion Halo नावानं लाँच होऊ शकतो. चिनी सर्टिफिकेशन साईट 3C आणि बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म गिकबेंचवर हा डिवाइस दिसला आहे.  

गीकबेंच लिस्टिंगनुसार, या फोनमध्ये चार CPU कोर मिळतील. प्रायमरी कोरचा स्पीड 3.19GHz आणि अन्य कोर्सचा वेग 2.02GHz वर क्लॉक्ड आहे. सोबत अड्रीनो 730 GPU देखील मिळेल. गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 1299 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 3953 स्कोर लेनोवोच्या आगामी गेमिंग फोनला मिळाला आहे.  

Lenovo Legion Halo चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार, फोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी+ P-OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो किंवा डेप्थ कॅमेरा असेल.   

कंपनी या फोनला 16 जीबी पर्यंतचा LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते, जी 68 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोन खूप स्लिम डिजाइनसह येऊ शकतो, याची जाडी 8mm इतकी कमी असू शकते.  

Web Title: Lenovo legion halo gaming smartphone spotted on geekbench  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.