सर्वात स्लिम गेमिंग लॅपटॉप भारतात लाँच; इतकी आहे दमदार Lenovo Legion Slim 7 ची किंमत
By सिद्धेश जाधव | Published: March 1, 2022 04:55 PM2022-03-01T16:55:49+5:302022-03-01T16:55:56+5:30
Lenovo नं भारतात आपला नवीन गेमिंग लॅपटॉप लाँच केला आहे. यात AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर देण्यात आला आहे.
Lenovo Legion Slim 7 भारतात लाँच झाला आहे. हा जगातील आतापर्यंतचा सर्वात पातळ गेमिंग लॅपटॉप आहे. यात Window 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते आणि सोबत AMD Ryzen 7 5800H प्रोसेसर देण्यात आला आहे. लॅपटॉप Dolby Vision ला सपोर्ट करतो. चांगल्या गेमिंग एक्सपीरियंससाठी कंपनीनं Nahimic 3D चा सपोर्ट दिला आहे.
Lenovo Legion Slim 7 Specifications
यात 15.6 इंचाचा WQHD IPS अँटी-ग्लेयर डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 2560×1440 पिक्सल रिजोल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. सोबत DC Dimmer टेक्नॉलॉजी आणि Dolby Vision मिळते. Windows 11 सह येणारा हा डिवाइस AMD Ryzen 7 5800H प्रोसेसरवर चालतो. सोबत Nvidia GeForce RTX 3060 आणि 6GB GDDR6 ग्राफिक्स मेमरी देण्यात आली आहे.
या लॅपटॉप मध्ये 16GB पर्यंत RAM चा वापर करता येतो. सोबत 1TB स्टोरेज देण्यात आली आहे. यात RGB लाइटिंग असलेला फुल साईज कीबोर्ड आहे. कंपनीनं 720p वेबकॅम दिला आहे. यातील 71Whr ची बॅटरी फुल चार्जवर 8 तासांचा बॅकअप देते.
Lenovo Legion Slim 7 ची किंमत
Lenovo Legion Slim 7 ची किंमत 1,44,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा लॅपटॉप Shadow Black या एकाच कलर व्हेरिएंटमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि रिटेल स्टोरवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त ग्राहकांना 3 महिन्यांचा Xbox गेम पास 100 हाय क्वालिटी PC गेम्ससह मिळेल.
हे देखील वाचा:
- ‘या’ स्मार्टफोनची किंमत पाहून तुम्ही स्वतःला रोखू शकणार नाही; 108MP कॅमेऱ्यासह किफायतशीर 5G फोन लाँच
- 18GB दमदार RAM सह Lenovo Legion Y90 गेमिंग फोन लाँच; इतकी आहे मोठया बॅटरीसह येणाऱ्या मोबाईलची किंमत
- 15 हजारांच्या आत फाडू फोन; 11GB RAM, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह POCO M4 Pro ची भारतात एंट्री