22GB रॅम, 640GB स्टोरेजसह येतोय जगातील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; सॅमसंग-शाओमीलाही झेपलं नाही हे काम
By सिद्धेश जाधव | Published: January 25, 2022 01:07 PM2022-01-25T13:07:55+5:302022-01-25T13:08:53+5:30
Lenovo Legion Y90: Lenovo Legion Y90 कंपनीचा आगामी गेमिंग फोन आहे. जो जगातील 22GB RAM सह येणारा पहिला स्मार्टफोन असू शकतो. सोबत 640GB स्टोरेज, 5600mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.
Lenovo लवकरच आपला पॉवरफुल गेमिंग स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा आगामी शक्तिशाली स्मार्टफोन Lenovo Legion Y90 नावानं सादर करण्यात येईल. या हा स्मार्टफोनमध्ये 22GB रॅम आणि 640GB इंटरनल स्टोरेज, 5600mAh बॅटरी आणि 44MP सेल्फी कॅमेरा असे एकपेक्षा एक सरस स्पेसिफिकेशन्स मिळतील. हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल जो 22GB RAM सह बाजारात येईल.
डिस्प्ले आणि बॅटरी
टिपस्टर Pandayisbald नं दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.92 इंचाचा E4 Samsung AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 720Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करेल. हे फीचर्स गेमिंग फोनसाठी आवश्यक आहेत. हा फोन 5600mAh ची बॅटरीसह बाजारात येईल, जी 68 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
रॅम, स्टोरेज आणि प्रोसेसर
या फोनमध्ये 18GB RAM मिळेल सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम असेल, त्यामुळे एकूण 22GB रॅम या फोनमध्ये होईल. 640GB इंटरनल स्टोरेजसाठी कंपनी 512GB आणि 128GB ची स्टिक एकत्र जोडणार आहे. या फोनमधील प्रोसेसर देखील बाकी स्पेक्स प्रमाणे दमदार असेल. कंपनी यात क्वालकॉमच्या पॉवरफुल चिपसेट म्हणजे स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चा वापर करणार आहे.
कॅमेरा आणि लाँच डेट
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 64 मेगापिक्सलचा OmniVision सेन्सर प्रायमरी कॅमेरा आणि 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा मिळेल. तसेच, सेल्फीसाठी या फोनमध्ये 44 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. फोनची अचूक लाँच डेट अजून समोर आली नाही. परंतु मीडिया रिपोर्टमध्ये फेब्रुवारी महिन्याचा उल्लेख आला आहे.
हे देखील वाचा:
- लाँचपूर्वीच Realme 9 Pro ची किंमत-स्पेसिफिकेशन लीक; किफायतशीर असेल का 5000mAh बॅटरी असलेला हा फोन? जाणून घ्या
- हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...