MWC 2022: अगदी छोटे डिटेल्सही दिसतील या 10.61 इंचाच्या 2K डिस्प्लेवर; दमदार बॅटरीसह Lenovo चा फाडू टॅब आला
By सिद्धेश जाधव | Published: February 28, 2022 07:59 PM2022-02-28T19:59:30+5:302022-02-28T19:59:38+5:30
MWC 2022: Lenovo नं यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) मध्ये आपला नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच केला आहे.
Lenovo नं देखील यंदाच्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC 2022) मध्ये आपला दम दाखवला आहे. कंपनीनं आपला नवीन टॅब Lenovo Tab M10 Plus 3rd Generation लाँच केला आहे. यात 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या टॅबच्या बेस व्हेरिएंटची किंमत 249 यूरो (सुमारे 20,900 रुपये) आहे. लवकरच काही निवडक देशांमध्ये याची विक्री सुरु होईल.
Lenovo Tab M10 Plus 3rd Generation चे स्पेसिफिकेशन
या टॅबमध्ये 10.61-इंचाचा 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 400 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. हा टॅब Precision Pen 2 सह बाजारात येतो. दमदार साऊंडसाठी यात क्वॉड स्पिकरसह डॉल्बी अॅटमॉस साऊंडला सपोर्ट मिळतो. कंपनीनं याचे फ्रॉस्ट ब्लू आणि स्टॉर्म ग्रे कलर ऑप्शन सादर केले आहेत.
कंपनीनं टॅबच्या वाय-फाय मॉडेलमध्ये मीडियाटेक G80 चिपसेटचा वापर केला आहे. तर स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट वाय-फाय+एलटीई मॉडेलमध्ये आहे. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 12 ओएसवर चालतो.टॅबच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फ्रंटला देखील 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी 7700mAh ची मोती बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
हे देखील वाचा:
- 32GB रॅम आणि 21 तास बॅटरी लाईफसह Samsung चे दोन दमदार लॅपटॉप Galaxy Book 2 Pro आणि Book 2 Pro 360 लाँच
- MWC 2022: बड्या कंपन्यांच्या यादीत Realme चा देखील समावेश; जागतिक बाजारात सादर केली सर्वात शक्तिशाली सीरिज
- गेम्स खेळताना येणार नाहीत जाहिराती; Google नं भारतीय गेमर्सना दिली जबरदस्त भेट